दरवाजाचे कुलुप तोडून सोन्याचे दागीने व रोख रक्कम असा 63 हजारांचा ऐवज चोरट्याने पळविला..
करमाळा / संदेश प्रतिनिधी :
करमाळा : घराचे दरवाजाचे कुलुप तोडून घरातील सोन्याचे दागीने व रोख रक्कम असा ६३ हजारांचा ऐवज कोणीतरी अज्ञात चोरट्याने पळविले आहे, हा प्रकार ५ ऑक्टोबरच्या रात्री अंजनडोह (ता.करमाळा) येथे घडला आहे.
याप्रकरणी करमाळा पोलिसात सुनिल रामदास मासाळ (वय 32) रा.अंजनडोह ता.करमाळा जि.सोलापूर सध्या रा.महर्षी नगर,मार्केट यार्ड पुणे यांनी फिर्याद दिली असून त्यात त्यांनी म्हटले कि,
आमचे मूळगाव अंजनडोह ता.करमाळा हे असून गावची यात्रा असल्याने मी व पत्नी दिपाली ५ ऑक्टोबरला गावी अंजनडोह येथे आलो होतो. ५ ऑक्टोबरच्या रात्री ८ वा. सुमारास घरातील सर्वजण देवाचा छबीण्याचा कार्यक्रम पाहण्याकरीता अंजनडोह गावामध्ये गेलो होतो.
अंजनडोह गावातील देवाचे छबीण्याचा कार्यक्रम पाहुन मी व आमचे घरातील लोक ६ ऑक्टोबर रोजी पहाटे 02:30 वा.चे सुमारास परत घरी आलो असता घराचा एक दरवाजा उघडा असल्याचे दिसले. त्यावेळी मी व घरातील लोकांनी घरामध्ये जावून पाहीले असता घरातील साहीत्य अस्थाव्यस्त पडलेले होते.
त्यावेळी आम्ही घरातील साहीत्य पाहीले असता घरातील पेटीचे कुलुप तोडून पेटीमधील सोन्याचे दागीने व वापरण्याची कपडे दिसून आले नाहीत. त्यावेळी पेटीमधील सोन्याचे दागीने व वापरण्याची कपडे कोणीतरी अज्ञात चोरटयाने चोरून नेल्याची आमची खात्री झाली. चोरीस गेले साहीत्याचे वर्णन पुढीलप्रमाणे 1)30,000/- रू एक तोळे वजनाचा सोन्याचा गंठण जुवाकिंअं. 2)15,000/- रू.एक अर्धा तोळे वजनाची गळ्यातील सोन्याची ठुसी जुवाकिंअं. 3)15,000/- रू. एक अर्धा तोळे वजनाची कानातील फुले झुब्याची जोडी जुवाकिंअं. 4) 3,000/- रू त्यामध्ये साडया व शालु असा एकूण 63,000/- रूपये कोणीतरी अज्ञात चोरट्याने पळवून नेले आहे. याप्रकरणी करमाळा पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.