‘इरा पब्लिक स्कुल’ची परंपरा उत्तम – विद्यार्थ्यांना लाभ होणार : प्रा.गणेश करे-पाटील
करमाळा / संदेश प्रतिनिधी :
करमाळा : ‘इरा पब्लिक स्कुल’ची परंपरा उत्तम असून,जेऊर येथील लहान विद्यार्थ्यांना लाभ होणार आहे. पालकांनी या सुविधेचा फायदा घ्यावा व आपल्या पाल्यांना या शाळेत पाठवावे, असे आवाहन यश कल्याणी संस्थेचे अध्यक्ष गणेश करे-पाटील यांनी केले.
इरा पब्लिक स्कूल च्या जेऊर (ता.करमाळा) येथील दुसर्या शाखेचे उद्घाटन जेऊर चे सरपंच पृथ्वीराज पाटील यांच्या हस्ते झाले त्यावेळी श्री.करे-पाटील बोलत होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून संत साहित्याचे अभ्यासक ॲड.डॉ.बाबूराव हिरडे हे होते.
या उद्घाटन प्रसंगी सुरुवातीला “राजमाता जिजाऊ व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले” यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून व द्वीप प्रज्वलन करून मान्यवरांच्या हस्ते सर्व क्लासरूमची फीत कापून उद्घाटन करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर जेऊर गावचे सरपंच पृथ्वीराज पाटील, माजी सभापती अतुल पाटील, उपसरपंच नागेशशेठ झांजुर्णे, राजुशेठ गादिया, भास्कर कांडेकर, संदीप शेठ कोठारी, शेलगावचे सरपंच अमर ठोंबरे, धनंजय शिरसकर, वांगी २ चे सरपंच सुरेशनाना जाधव, पांडुरंग वाघमारे वांगी ३ चे सरपंच मयूर रोकडे, नितीन कदम,गजेंद्र पोळ आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे सचिव सुनील अवसरे व संस्थेचे अध्यक्ष डॉ.ब्रिजेश बारकुंड यांनी केले, यावेळी प्रा.गणेश करे-पाटील , डॉ.ॲड बाबुराव हिरडे व अतुल पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्कूलचे मुख्याध्यापक कसबे सर यांनी केले, तर आभार प्रदर्शन अवसरे मॅडम यांनी केले.
हा कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी संस्थेचे संचालक मंडळ, व शिक्षक वृंद आणि शिक्षकेतर कर्मचारी या सर्वांनी अथक परिश्रम घेतले.