महसूल सहाय्यक पदी निवड झालेल्या दोघांचा चिखलठाण ग्रामस्थांकडून सत्कार

करमाळा(दि.१८): करमाळा तालुक्यातील चिखलठाण येथील आकाश दिलीप गलांडे व विद्या पांडुरंग बारकुंड यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या परीक्षेमध्ये महसूल सहाय्यक पदी निवड झाली आहे. ग्रामस्थांच्या वतीने शाल व श्रीफळ देऊन या दोघांचा सन्मान करण्यात आला.
याबाबत सोलापूर जिल्हा परिषदचे माजी उपाध्यक्ष राजेंद्रकुमार बारकुंड यांनी पुढाकार घेऊन ग्रामस्थांच्या उपस्थितीत सत्कार संभारंभ आयोजित केला होता.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ग्रामसेवक श्रीकांत बारकुंड यांनी केले.यावेळी उपस्थित सरपंच विकास गलांडे,पोलीस पाटील गायकवाड,हेमंत बारकुंड,चंद्रकांत सुरवसे, बालाजी पवार,दिलीप गलांडे,पांडुरंग बारकुंड,सतीश बनसोडे,धनाजी बारकुंड,फिरोज तांबोळी यांच्या अनेक ग्रामस्थ उपस्थित होते.





