अल्लड वयातील तरुणाईचे प्रेमविवाह घातक! ऐन तारुण्यातील घटस्फोट पालकांसाठी चिंतेची बाब - सौ.शीला अवचर - Saptahik Sandesh

अल्लड वयातील तरुणाईचे प्रेमविवाह घातक! ऐन तारुण्यातील घटस्फोट पालकांसाठी चिंतेची बाब – सौ.शीला अवचर

संग्रहित छायाचित्र

सध्याच्या एकविसाव्या शतकातील बदलते विचार व सोशल मीडियाच्या अतिवापरामुळे होणारे दुष्परिणाम सध्या जाणू लागलेले आहेत. जगातील मोबाईल वापरणारा देशांमध्ये भारत देश हा अव्वल क्रमांक वरती पोहोचताना दिसत आहे. यातच आजकालचे तरुण पिढीला मोबाईलचा व्यसनाचा विळखा बसलेला आहे. यातूनच नको त्या गोष्टींचा प्रसार होत असल्यामुळे अक्षरशः लहानपणापासूनच मुला – मुलींना नको त्या गोष्टींची आकर्षण वाढू लागले आहे. सध्या एका कुटुंबामध्ये जर किमान सहा-सात सदस्य असतील तर सर्वांकडेच मोबाईल असल्यामुळे एकमेकाचा संवाद हा बंद झालेला आहे. ठीक आहे मुलांचे पालकांना मोबाईल गरजेचा असेल त्यामुळे त्यांचाही अतिवापर होत असेल परंतु यामुळे पालकांचेही मुलांवरील लक्ष कमी झालेले आहे. आणि याच कारणामुळे आजकालची नवीन पिढी ही भरकटत चाललेली आहे.

यामध्ये विशेषतः 18 ते 20 वर्षातील अल्लड वयाच्या तरुणी जन्मदात्या माता पित्यांना विसरून प्रियकरा सोबत पळून जाऊन प्रेमविवाह करत आहेत. कोरोना नंतर या प्रकारांमध्ये विशेष करून मोठ्या प्रमाणात वाढ झालेली  आहे. वास्तविक पाहता १८ ते२० हे वय मुलींच अल्लड वय असते. त्यांना आपण काही चुकीच्या गोष्टी करतोय याची जास्ती समज नसते व त्या अल्लडपणामध्ये त्यांच्यातून हे चुकीचे निर्णय घेतले जातात. त्या तुलनेत “मुले” ही वयाने मोठे असतात त्यांना बऱ्यापैकी समज असते परंतु मुलींना प्रेमाच्या जाळ्यात अडकवुन ते मुलींना हे निर्णय घेण्यास प्रवृत्त करतात. परंतु जेव्हा एक-दोन वर्षात मुलींना या गोष्टीची समज येते तेव्हा वेळ निघून गेलेली असते आणि त्याच कारणाने लग्नानंतर एकमेकांचे भांडणे सुरू होतात. व भांडणे एवढी टोकाची होतात त्यानंतर त्यांचा घटस्पोट आत्महत्या,खून सारख्या भयानक घटना वारंवार घडताना दिसत आहेत. व यामध्ये त्या परिवारातील पूर्ण पिढी बरबाद होत आहे.

या माध्यमातून माझी पालकांना व तरुण पिढीला एकच विनंती आहे, की कुटुंबात पालकांसोबत सुसंवाद ठेवा. कोणतेही महत्त्वाचे निर्णय घेताना आपल्या जन्मदात्या आई-वडिलांना विश्वासात घ्या. नक्कीच खरे आहे प्रेम हे आंधळे असतं जेव्हा त्या प्रेमाची झापड आलं वयातील मुलींवर ती पडते तेव्हा त्या अशा चुकीच्या मार्गाने वाहल्या जातात. परंतु यातून बाहेर निघण्यासाठी नक्कीच तुमचे पालक हे तुम्हाला मदत करतील. तुमच्या पालन पोषणाकरता आयुष्य वाहिलेले पालक हे तुमच्या उज्वल भविष्याचा चांगलाच विचार करून तुमचा जीवनसाथी शोधत असतात त्यांच्यावरती विश्वास ठेवा.

✍️ सौ.शीला प्रविणकुमार अवचर, मांगी (ता.करमाळा)

सौ.शीला अवचर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!