पोथरेकरांचा अनोखा उपक्रम – एकाच मंडपात 260 मातापित्यांचा सन्मान – राज्यातील पहिलीच घटना..
करमाळा / संदेश प्रतिनिधी :
करमाळा : पोथरे (ता.करमाळा) येथे अनोखा उपक्रम साजरा करण्यात आला असून, एकाच मंडपाखाली एकाचवेळी २६० माता-पित्यांचा पाद्यपुजा करून विशेष सन्मान करण्यात आला आहे. ही घटना राज्यातील पहिलीच असून अनेकांनी या उपक्रमाचे कौतूक केले आहे.
पोथरे येथील हनुमान भजनी मंडळ व ग्रामस्थांनी अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन केले होते. हा सप्ताह गावातील ग्रामदैवत भैरवनाथ यात्रेच्या निमित्ताने आयोजित केलेला होता. या अखंड हरिनाम सप्ताह मध्ये काकडा, ज्ञानेश्वरी पारायण, भजन, प्रवचन, किर्तन व हरिजागर असे कार्यक्रम आयोजित केले होतेच. त्याबरोबरच १२ एप्रिलला सामुदायिक माता-पित्यांच्या सन्मानाचा कार्यक्रम आयोजित केला होता. यानिमित्ताने गावातील २६० माता-पित्यांची रथ, ट्रॅक्टर यामधून सवाद्य मिरवणूक गावातून काढण्यात आली होती. यावेळी १८ ट्रॅक्टरमधून मिरवणूक निघाली होती.
मिरवणुकीच्या पुढे टाळ-मृदुंग भजन याबरोबरच इतर वाद्यांचाही समावेश होता. सायंकाळी चार वाजता निघालेली मिरवणूक मंडपामध्ये सहा वाजता आली. त्यानंतर जवळपास एक तास माता-पित्यांचा गौरव करत त्यांची पाद्यपुजा केली. यावेळी ह.भ.प.बंडोपंत कुलकर्णी महाराज यांनी मंत्रघोष सादर केला. तसेच गावचे पोलीस पाटील संदीप शिंदे, ॲड. नानासाहेब शिंदे, हरिश्चंद्र झिंजाडे, हरिश कडू, प्रशांत ढवळे, प्रा. आजिनाथ झिंजाडे व ॲड. डॉ. बाबूराव हिरडे यांनी या उपक्रमाबाबत मार्गदर्शन केले. यावेळी सर्व माता-पित्यांचे पाद्यपूजन करून दर्शन घेऊन त्यांच्या गळ्यात हार अर्पण करून त्यांचेवर पुष्पवृष्टी करत तोंडात पेढे भरून व पायावर डोके टेकवून त्यांच्याबद्दल आदर व्यक्त केला.
या कार्यक्रमाचे आयोजन हनुमान भजनी मंडळाचे मृदुंगाचार्य चंद्रकांत संजय शिंदे, ह.भ.प.नाना महाराज पठाडे, गंगाधर शिंदे, आबासाहेब भांड, प्रेमराज शिंदे, हरिश्चंद्र झिंजाडे, दादा मोहन शिंदे, छगन आबा शिंदे, किसन आबा झिंजाडे, जयद्रथ झिंजाडे सर, चिंतामणी पाटील, आदिनाथ झिंजाडे, रघुनाथ जाधव, शांतीलाल झिंजाडे, चंद्रकांत झिंजाडे, हर्षद आढाव, गणेश ढवळे, विशाल भैय्या झिंजाडे, विलास महाराज शिंदे, अशोक महाराज दळवी, आण्णासाहेब शिंदे-पाटील, सुनील काळे, माऊली झिंजाडे, शिवाजी आप्पा झिंजाडे, गेनदेव ठोंबरे, दयानंद रोही, संदिप नंदरगे, राज झिंजाडे, माऊली पुराणे, योगेश ठोंबरे, अनिल झिंजाडे, नितीन साळुंके, सोमनाथ झिंजाडे, रमेश आमटे, अनिल दळवी, संतोष ठोंबरे, अमोल साळुंके, लखन शिरगीरे, संग्राम आढाव, बाळासाहेब आमटे, दादा शिंदे, अमोल शिंदे, दत्ता हिरडे, ओंकार रोही,
भैरवनाथ मंदिराच्या जीर्णोध्दारासाठी मदत…भैरवनाथ मंदिरातील फरशी काढून दुसरी फरशी बसविण्यासाठी भजनी मंडळाने आवाहन केले असता, अशोक ढवळे – पाच पोती सिमेंट, आबा चव्हाण दहा पोती सिमेंट, पोपट लगस सिमेंट, बंडू सर्जेराव झिंजाडे, पाच पोती सिमेंट तर माजी सरपंच संगीता कांबळे, दत्ता शिवाजी साळुंके, रमेश आमटे, गणेश ढवळे, पाराजी शिंदे व सुनील जाधव (करमाळा) यांच्याकडून प्रत्येकी एक ब्रास फरशी, अमोल साळुंके यांच्याकडून वाळू तर हॉलीबॉल संघाच्या वतीने मजुरांची मजुरी देण्याचे जाहीर केले आहे. शांतीलाल जाधव या सर्वांनी उपक्रमासाठी सहकार्य केले.