पाटील गटाचा दणदणीत विजय - विरोधकांना भोपळाही फोडता आला नाही -

पाटील गटाचा दणदणीत विजय – विरोधकांना भोपळाही फोडता आला नाही

0
निकालानंतर जल्लोष करताना पाटील गटाचे  कार्यकर्ते

करमाळा(दि.२०) : श्री आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीचा निकाल जाहीर झाला असून झालेल्या निवडणुकीमध्ये पाटील गटाच्या आदिनाथ संजीवनी या पॅनलने विरोधकांचा धुव्वा उडवत २१ पैकी २१ जागेवर विजय मिळवला आहे. (आकडेवारी खाली दिली आहे)

श्री आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया गुरुवारी १७ एप्रिलला  निवडणूक पार पडली. एकूण ७२ मतदान केंद्रांवर झालेल्या मतदानात २९,०४१ मतदारांपैकी १७,६५४ मतदारांनी म्हणजेच ६०.७९ मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला.

या निवडणुकीत माजी आमदार संजयमामा शिंदे, विद्यमान आमदार नारायण पाटील तसेच झोळ गटाचे प्रा. रामदास झोळ यांनी आपापल्या पॅनलसह स्वतः या निवडणुकीच्या रिंगणात उडी घेत तिरंगी लढत दिली.  जगताप व बागल गटाने या निवडणुकीत माघार घेतली होती. जगताप यांनी सुरवातीलाच जाहीरपणे पाटील गटाला पाठिंबा दिला होता तर बागल गटाने शेवटच्या क्षणी आपला पाठिंबा पाटील गटाला जाहीर केला होता. यामुळे शिंदे व झोळ गटाचा या निवडणुकीत दारुण पराभव झाला आहे. 

विशेष म्हणजे माजी आमदार संजयमामा शिंदे हे केम गटातून तर  प्रा. रामदास झोळ हे पोमलवाडी गटातून दोघे देखील पराभूत झाले आहेत. तसेच त्यांच्या पॅनलला या निवडणुकीत भोपळाही फोडता आला नाही. झोळ गटाचे दशरथ कांबळे यांनी सहकारी संस्था व अनुसूचित जाती जमाती या दोन वेगवेगळ्या गटातून उमेदवारी भरली होती परंतु दोन्ही ठिकाणाहून ते पराभूत झाले आहेत. पाटील गटाच्या कार्यकर्त्यांनी निवडणुकीच्या निकालानंतर गुलाल उधळून, हलगी वाजत जल्लोष करत विजय साजरा केला.

पाटील गटाच्या आदिनाथ संजीवनी पॅनलने या निवडणुकीत दणदणीत विजय मिळवला आहे. आता या पॅनलला आदिनाथला रुळावर आणण्याचे मोठे आवाहन पार करावे लागणार आहे.  कारखाना  सुरू करुन जुनी देणी देणे, कारखाना कर्जमुक्त करणे, आदिनाथला नवसंजीवनी देणे आदी आवाहने पार करून शेतकरी वर्गाचा, मतदारांचा विश्वास सार्थ करणे गरजेचे आहे.

निवडणूक निर्णय अधिकारी व त्यांचे साहाय्यक अधिकारी वर्ग व स्टाफ

व्यक्ती उत्पादक पोमलवाडी या गटामधून कवडे किरण जगन्नाथ हे 8571 मतांनी, झोळ  नवनाथ मधुकर हे 8343 मतांनी तर पाटील संतोष खासेराव हे 8328 मतांनी विजयी झाले आहेत. (सर्व विजयी उमेदवार पाटील गटाचे)

व्यक्ती उत्पादक रावगाव गटातून पाटील गटाचे उमेदवार अमोल नानासाहेब घाडगे हे 8575 मते मिळवून विजयी झाले आहेत. त्याचबरोबर देवानंद गोपाळराव बागल हे 8092 मतांनी तर राहुल सुभाष सावंत यांना 8036 मते मिळाली असून ते विजयी झाले आहेत. (सर्व विजयी उमेदवार पाटील गटाचे)

भटक्या विमुक्त जाती व जमाती विशेष मागास प्रवर्ग प्रतिनिधी गटाच्या निवडणुकीत विद्यमान आमदार नारायण आबा गोविंदराव पाटील (रा. जेऊर ता. करमाळा) यांनी 9462 मते मिळवत विजय संपादन केला आहे. त्यांचे प्रमुख प्रतिस्पर्धी केकान अनिल शहाजी (रा. शेलगाव वां. ता. करमाळा) यांना 6879 मते मिळाली, तर खाडे रायचंद कृष्णा (रा. शेलगाव वां. ता. करमाळा) यांना केवळ 871 मते प्राप्त झाली.

उत्पादक सहकारी संस्था, बिगर उत्पादक संस्था व पाणन संस्था प्रतिनिधी मतदार संघात  एकूण ३४१ वैध मते नोंदवली गेली. यामध्ये केवारे हरिदास तुळशीदास (रा. आळजापूर) यांनी २०९ मते मिळवत स्पष्ट विजय मिळवला. बागल सुजित शिवाजी (रा. मांगी) यांना १२७ मते मिळाली, तर कांबळे दशरथ भिमराव (रा. करमाळा) यांना केवळ ५ मते मिळाली. बागल व कांबळे हे या गटातून पराभूत झाले.

व्यक्ती उत्पादक केम गटातून पाटील गटाचे देशमुख दत्तात्रय हरिश्चंद्र यांनी 8625 मते मिळवून या गटातून प्रथम क्रमांकाने विजयी झाले दुसऱ्या क्रमांकावर पाटील महेंद्र दिनकर हे 8337 मतांनी विजयी झाले आहेत. तर नवले विजय जिजाबा यांनी 8106 मते मिळवत या गटातून विजय प्राप्त केला आहे. माजी आमदार संजयमामा शिंदे यांना 7060 मते मिळाली असून त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले आहे. (सर्व विजयी उमेदवार पाटील गटाचे)

व्यक्ती उत्पादक सालसे गटाच्या निवडणुकीत अंबारे वसंत शंकर यांनी ८४७९ मते घेऊन विजय मिळवला. त्यांच्यामागोमाग फुके रविकिरण पोपट यांनी ८२३२ मते घेत दुसरे स्थान पटकावले. तिसऱ्या क्रमांकावर हजारे दशरथ येदु यांनी ७९३३ मते मिळवत गटातून तिसरा क्रमांकांची मते मिळवली. (सर्व विजयी उमेदवार पाटील गटाचे)

इतर मागासवर्गीय जातीच्या गटातून पाटील दादासाहेब नामदेव हे 9129 मतांनी निवडून आलेले आहेत तर रोहिदास देविदास माळी यांना 7146 मते मिळालेली असून ते पराभूत झाले आहेत.

महिला राखीव प्रतिनिधी या गटामधून तळेकर राधिका भीमराव या 8537 मतांनी तर सरडे उर्मिला हनुमंत 8383 इतक्या मतांनी निवडून आलेल्या आहेत. (सर्व विजयी उमेदवार पाटील गटाचे)

व्यक्ती उत्पादक जेऊर गट या गटामधून गव्हाणे दत्तात्रय रामचंद्र 8607, चौधरी श्रीमंत त्रिंबक 8061, तर पोरे महादेव श्रीपती 8195 इतके मत घेत हे तिघेजण निवडून आलेले आहेत. सर्व विजयी उमेदवार पाटील गटाचे आहेत.

अनुसूचित जाती /अनुसूचित जमाती प्रतिनिधी गटातून कदम राजेंद्र भीमा यांनी  8806 मते मिळवत  विजयश्री खेचून आणला आहे.  त्यांचे प्रतिस्पर्धी सोनवणे बाळकृष्ण आप्पा यांना 7226 मते मिळाली असून ते पराभूत झाले आहेत.

बातमी संपादन – सूरज हिरडे
सुलेखन– प्रशांत खोलासे, केडगाव(ता.करमाळा)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!