नेरले गावात प्रथमच थांबा मिळालेल्या एसटी बसचे ग्रामस्थांनी केले उत्साहात स्वागत

करमाळा (दि.२९) – नेरले गावात थांबा मिळणारी एसटी बस प्रथमच सुरू झाली आहे. २६ ऑगस्ट रोजी करमाळा-कुर्डुवाडी-करमाळा अशी बस प्रथमच नेरले गावात आल्यानंतर सर्व ग्रामस्थांनी या एसटी बस चे उत्साहात स्वागत केले. एसटीच्या ड्रायव्हर व कंडक्टर यांचा हारतुरे देऊन सन्मान यावेळी ग्रामस्थांच्यावतीने करण्यात आला.

नेरले हे गाव सुमारे पाच हजार लोकसंख्येचे गाव आहे. आजपर्यंत लांब पल्ल्याची एकही बस गावात येत नाही.एक मुक्कामी बस रात्री साडे आठला येते व सकाळी सहा ला जाते,नंतर दिवसभर एकही बस नेरले गावाला नाही.त्यामुळे नागरिकांना प्रवास करण्यासाठी खूप त्रास होत होता .नेरले वरून गौंडरेला अनेक विद्यार्थी व नागरिक बँकेच्या कामासाठी शिक्षणासाठी जातात तसेच आवाटी सालसे निमगाव, कोळगाव, हिसरे, हिवरे येथून देखील अनेक विद्यार्थी व नागरिक बँकेचे कामासाठी कोळगाव प्रकल्पाकडे जाण्यासाठी गौंडरे येथे येतात नागरिकांच्या व विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी तसेच नागरिकांना कुर्डूवाडी येथून रेल्वेने सोलापूर पुणे, मुंबई इतर ठिकाणी जाण्यासाठी व करमाळा येथे शासकीय कामासाठी येणे जाण्यासाठी एसटीची अत्यंत गरज होती.

त्यामुळे करमाळा-कुर्डूवाडी बस हिसरे-कोळगाव-निमगाव -गौंडरे-नेरले-वरकुटे-बारलोणी मार्गे कुर्डूवाडी व त्याच मार्गे परत करमाळा अशी सुरू करावी अशी अनेक वर्षे ग्रामस्थांची मागणी होती. त्याप्रमाणे दि.२६ ऑगस्ट रोजी ही बस सुरू करण्यात आली.त्यामुळे नेरले गौंडरे निमगाव हिवरे परिसरातील नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.त्यामुळे अधिकारी कर्मचारी व पत्रकार बंधूचे विशेष आभार नागरिकांच्या वतीने मानले व निमगाव गौंडरे नेरले येथे शेकडो नागरिकांनी उत्साहात बसचे स्वागत केले.

जास्तीत जास्त नागरिकांनी बसने प्रवास करावा अशी विनंती नेरले ग्रामपंचायत माजी सरपंच व हिंदवी स्वराज्य ग्रुपचे संस्थापक श्री औदुंबरराजे भोसले यांनी यावेळी केली
संबंधित बातमी – करमाळा-कुर्डूवाडी बस नेरले मार्गे सुरु – माजी सरपंच औदुंबरराजे भोसले यांच्या मागणीला यश..

