मांगी गावचे माजी सरपंच बाळासाहेब बागल यांचे निधन
करमाळा (दि. २९) – मांगी गावचे माजी सरपंच बाळासाहेब बापूराव बागल यांचे आज गुरुवार दिनांक २९ ऑगस्ट रोजी पहाटे १ वाजता अल्पशा आजाराने निधन झाले. मृत्यू समयी त्यांचे वय वर्षे ५९ होते. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, मुलगी, सून, नातवंडे, 3 भाऊ आणि तीन बहिणी असा माेठा परिवार आहे.
त्यांचा अंत्यविधी आज गुरुवारी सकाळी ९ वाजता त्यांच्या राहत्या घराजवळील शेतामध्ये करण्यात आला .त्यांच्या अंत्ययात्रेसाठी मांगी पंचक्रोशी सह करमाळा तालुक्यातील पै. पाहुणे नातेवाईकांसह विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
घरातील भावंडात सर्वात लहान असणारे बाळासाहेब बागल हे अत्यंत मनमिळाऊ स्वभावाचे होते. मांगी येथील सामाजिक उपक्रमात त्यांचा मोठा सहभाग होता. त्यांच्या आकस्मित जाण्याने मांगी गावावरती शोककळा पसरलेली आहे.