शिवाजीनगर मध्ये घरासमोर लावलेल्या मोटारसायकलची चोरी
करमाळा / संदेश प्रतिनिधी
करमाळा : करमाळा शहरातील शिवाजीनगर भागात घरासमोर लावलेल्या मोटारसायकलची चोरी झाली आहे. हा प्रकार १६ जुलैच्या मध्यरात्री घडला आहे. या प्रकरणी वैभव दिगंबर तोरणे (रा. शिवाजीनगर, करमाळा) यांनी फिर्याद दिली आहे.
त्यात त्यांनी म्हटले आहे की, मी साडे येथील बँक ऑफ इंडिया शाखेत नोकरीस असून करमाळा येथे शिवाजीनगर मध्ये राहतो. १६ जुलैला सायंकाळी मी राहत असलेल्या घरासमोर होंडा कंपनीची मोटारसायकल क्र. एमएच १३ सीजी ४६२९ ही हॅन्डल लॉक करून लावली होती. सकाळी सदरची मोटारसायकल चोरट्याने चोरून नेल्याचे समजले आहे. या प्रकरणी पोलीसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.