लहान मुलाला मारल्याच्या कारणावरून एकास गजाने मारहाण
करमाळा / संदेश प्रतिनिधी
करमाळा : माझ्या नवसाच्या मुलाला तु चापट का मारलीस, असे म्हणून एकाने दुसऱ्यास लोखंडी गजाने मारहाण केली आहे. हा प्रकार २० जुलैला सकाळी आठ वाजता हिवरवाडी येथे घडला आहे.
या प्रकरणी रामभाऊ नामदेव सांगळे (रा. हिवरवाडी) यांनी फिर्याद दिली आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की.. आमच्या गावातील नंदू सदाशिव इरकर याच्या मुलाचे व माझ्या नातवाची वादावादी झाली.
त्यावेळी मी दोन्ही मुलांना रागावलो होतो. त्याचा राग मनात धरून नंदू इरकर याने २० जुलैला सकाळी आठ वाजता मी आमच्या गावातील मारूती मंदिरात गेलो असता, तेथे येवून त्याने लोखंडी गजाने माझ्या पाठीवर, मांडीवर व लवणीवर मारहाण करून माझ्या नवसाच्या मुलास चापट का मारली असे म्हणून माझ्या कानाखाली चापट मारून शिव्या देवून निघून गेला. या प्रकरणी पोलीसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.