वीट येथे एक लाख दहा हजाराची चोरी

करमाळा/संदेश प्रतिनिधी
करमाळा,ता.23: वीट (ता.करमाळा) येथे बस स्थानकाजवळील डॉ. देविदास पांढरे यांच्या घरी मध्यरात्री एक वाजता चोरी झाली आहे. त्यात चोरट्यांनी दोन सोन्याच्या अंगठ्या व रोख दहा हजार असा एक लाख दहा हजार रूपयांचा ऐवज चोरून नेला आहे.
परिवार घरात झोपलेला असतानाही दार उघडून कपाटाचे कुलूप काढून चोरटय़ांनी वरील ऐवज चोरून नेला आहे. डॉ. पांढरे यांनी या प्रकरणी करमाळा पोलीसाकडे तक्रार दिली आहे.