लोकसभेची ही निवडणूक आता जनतेने हाती घेतली आहे – धैर्यशील मोहिते-पाटिल

केम (संजय जाधव) – माढा लोकसभेची ही निवडणूक आता मोहिते- पाटील कुटुंबाची राहिली नसून जनतेने हाती घेतली आहे. जनता जनार्धन ठरवणार कोणत्या उमेद्वाराला निवडून द्यायचे असे प्रतिपादन केम येथील आयोजित केलेल्या जाहीर सभेत धैर्यशील मोहिते पाटील यांनी केले.

यावेळी व्यासपीठावर माजी आमदार नारायण पाटील शिवसेनेचे सोलापूर जिल्हा सहसंपर्क प्रमुख साईनाथ अभंगराव, उपजिल्हाप्रमुख शाहू फरतडे युवा सेनेचे समाधान फडतडे करमाळा नगरपालिकेचे माजी नगर अध्यक्ष वैभव जगताप, देवानंद बागल,अतुल पाटील सोलापूर जिल्हा परिषद माजी अध्यक्ष अनिरुद्ध कांबळे ज्येष्ठ नेते दिलीप दादा तळेकर गोरख नाना तळेकर शिवसेना महिला आघाडीच्या तालुका प्रमुख वर्षा चव्हाण सरपंच सारिका कोरे,शिवसेनेचे सतीश खानट, श्री हरी तळेकर, उत्तरेश्वर तळेकर अविनाश तळेकर माजी सरपंच अजित तळेकर, बिले सर,माजी सभापती शेखर गाडे, चेअरमन बापूराव तळेकर, युवा सेनेचे सागर तळेकर, किरण तळेकर, भगत सर, कंदरचे सरपंच मौला,मुलाणी, पोपट साळुंखे आवीनाश तळेकर शिवराज जगताप आदि उपस्थित होते.

या कार्यक्रमाची प्रस्ताविका चेअरमन अरुण लोंढे यांनी केले. यावेळी धैर्यशील मोहिते पाटील पुढे बोलताना म्हटले म्हणाले माझी उमेदवारी भाजपने नाकारली त्यावेळी मी शांत बसायचे ठरवले होते परंतु लोकांनी दादांना फोन करून काही झाले तर ही निवडणूक मोहिते पाटलांनी लढवावी अशी आग्रही मागणी केली ही निवडणूक जर मोहिते पाटील यांनी लढवली नाही तर इथून पुढे आमच्याकडे यायचे नाही असा प्रेमाने युवकांनी दम दिला त्यामुळे मी अनेक गावात दौरा केला या ठिकाणी जुन्या काळातील आठवणी सांगून युवकांनी काही झालं तर मी निवडणूक लढवावी असा आग्रह धरला निवडणूक सोलापूर जिल्हा अस्तित्वाची आहे असे नागरिकांनी सांगितले आम्ही त्यावेळेस ही निवडणूक जनतेसाठी व स्वाभिमाना साठी लढायची यासाठी कोणतीही किंमत मोजावी लागली तरी चालेल असा निर्णय घेतला त्यानंतर आम्ही देशाचे नेते शरदचंद्रजी पवार साहेब यांच्याकडे जाऊन उमेदवारी मागितली.

यावेळी साईनाथ अभंगराव म्हणाले ज्या भाजपने शिवसेना फोडण्याचा पाप केले आहे त्याचा बदला आपल्या शिवसैनिकाला घ्यायचा आहे त्यासाठी आपण मोहिते पाटील यांच्याशी पाठीशी खंबीरपणे उभे राहून त्यांना निवडून आणण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावा यावेळी त्यांनी भाजपने आत्तापर्यंत किती लोकांना त्रास दिला याचे उदाहरण सांगितले शिवसेना आतापर्यंत किती वेळा फुटली पण शिवसेना कुणाच्या बापाला संपणार नाही शिवसेना जोमाने उभारली यावेळी त्यांनी भाजपचा खरपूस समाचार घेतला.

यावेळी माजी आमदार नारायण पाटील म्हणाले ही निवडणूक कोणत्याही गटातटाची नाही तर ही निवडणूक आपल्या देशाची शेतकऱ्यांच्या हिताची व पवार साहेबांचे आहे यासाठी सर्वांनी एकत्रपणे काम करून धैर्यशील मोहिते पाटील यांना प्रचंड मतांनी निवडून आणा असे आव्हान त्यांनी केले.

प्रसंगी उपजिल्हाप्रमुख शाहू दादा फरतडे युवा सेनेचे समाधान फरतडे माजी नगराध्यक्ष वैभव जगताप अतुल पाटील भगत सर चेतन नरोटे यांची भाषणे झाली.

या सभेत करमाळा तालुका भटक्या विमुक्त जमाती संघटना तसेच केम येथील मुस्लिम युवक संघटना व जुनी सेवानिवृत्त पेन्शन संघटनेच्या वतीने मोहिते पाटील यांना जाहीर पाठिंबा दिला या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नाना जगताप यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!