सामाजिक उपक्रम राबवित कंदर येथे टिपू सुलतान जयंती उत्साहात साजरी

करमाळा / संदेश प्रतिनिधी

करमाळा : कंदर (ता.करमाळा) येथे आज (दि.२५) शनिवारी स्वतंत्रता सेनानी टिपू सुलतान यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. ही जयंती कंदर येथील शेर ए हिंद शहीद टिपू सुलतान संघटना महाराष्ट्र १९९२ या संघटनेच्या वतीने आयोजित करण्यात आली होती.

या जयंतीनिमित्त सकाळी १० च्या सुमारास कंदर येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व खाऊ वाटप करण्यात आले. याबरोबरच दुपारी 2 च्या सुमारास कंदर परिसरात विविध ठिकाणी वृक्षारोपण करण्यात आले. या जयंतीनिमित्त टिपू सुलतान चौकात शरबत वाटप करण्यात आले. यानंतर कंदर मधून भव्य दिव्य मिरवणुक काढण्यात आली.

या क्रार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून कंदर ग्रामपंचायतीचे नूतन सरपंच मौलासाहेब मुलाणी हे उपस्थित होते. या कार्यक्रमाला उपसरपंच अमोल भांगे, सामाजिक कार्यकर्ते नानसाहेब कोकरे,शिवशंकर माने,उमेश ईगळे, सुभाष पवार,संभाजी लोंडे, संपत सरडे, राजु सरडे व जिल्ह्य परिषद शाळ्येचे सर्व शिक्षक वर्ग उपस्थित होते.

हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी शेरे ए हिंद टिपू सुलतान संघटना कंदर अध्यक्ष हशमुद्दीन तांबोली, दिलावर शेख, मिनहाज जहागीरदार, दादासाहेब मुलाणी, मतिन हवलदार,अजिम काझी,अब्दुल पठाण,आसिम जहागीरदार, मुबिन जहागीरदार, शाबीर मुलाणी,रफिक शेख, फुरकान काझी, अरबाज जाहगीरदार,वशिम जहागीरदार, चांद मुलाणी, आमन शेख,अमन काझी, इमरान जहागीरदार नासीर हवलदार, याकुब शेख, फिरोज शेख, मोहसिन जहागीरदार, इरफान जहागीरदार, रफिक जहागीरदार, अरमानशेख, कादर सय्यद शाहरुख हवलदार आदींनी परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!