केम येथे त्रिपुरा पौर्णिमा मोठ्या उत्साहात साजरी
केम (प्रतिनिधी/संजय जाधव) : केम तालुका करमाळा येथे त्रिपुरा पौर्णिमा मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.शंभर वर्षापासून राम फेरी काढण्याची प्रथा आजही केम येथील तरूणानी जपली आहे.
ही राम फेरी कोजागिरी पौर्णिमा पासून सुरू होती. तिची सांगता त्रिपुरी पौर्णिमाला होते. या एक महिन्याच्या कालावधीत येथील श्रीराम मंदिर विठ्ठल मंदिर सावता महाराज मंदिर श्री ऊत्तरेश्वर मंदिर या मंदिरामध्ये पहाटे चार वाजता काकडा होतो. या साठी महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित असतात तसेच रोज सकाळी राम फेरी या मंदिरात गौळणी,भजन राम भक्त म्हणतात. त्रिपुरा पौर्णिमा दिवसी याची सांगता झाली.
या निमित्त सजवलेल्या टेम्पो मध्ये रामाची भव्य प्रतिमा ठेवण्यात आली याची गावातून मिरवणूक काढण्यात आली या मिरवणूक मार्गावर महिलांनी रांगोळ्या घातल्या होत्या या मध्ये दाळमृदंगाच्या गजरात राम नामाने संपूर्ण केम नगरी दुमदुमून गेली होती या दिंडीत चेअरमन दादासाहेब गोडसे, भैरू शिंदे किरण तळेकर नंदू डावरे अनिल तळेकर,केदार पळसकर गणेश शेटे, नवनाथ दगडफोडे, संजय नागणे, ज्ञानेश्वर पळसे, राजेंद्र गायकवाड रामेश्वर पळसे,शिवाजी जाधव,आणा मोरे, दत्ता देवकर ज्ञानदेव तळेकर हरि, बिचीतकर, अक्षय भोसले, हरी वाघे श्रीराम गलांडे बाळासाहेब साखरे,विजय बप्पा,तळेकर यश धर्मराज, विष्णू अवघडे वेदपाठक साहेब आदि नारायण टोंपे, विठ्ठल तळेकर मेजर बालाजी मोरे आदि उपस्थित होते.