शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण न झाल्यास ऊस दर संघर्ष समिती व शेतकरी संघटनेच्यावतीने १५ नोव्हेंबरला तीव्र आंदोलन.. - Saptahik Sandesh

शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण न झाल्यास ऊस दर संघर्ष समिती व शेतकरी संघटनेच्यावतीने १५ नोव्हेंबरला तीव्र आंदोलन..

करमाळा / संदेश प्रतिनिधी :

करमाळा : ऊस दर संघर्ष समिती व शेतकरी संघटनेच्यावतीने शेतकऱ्यांच्या ऊसदरासंदर्भात व विविध मागण्यासाठी करमाळा तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले आहे, दिलेल्या निवेदनातील मागण्या पूर्ण न झाल्यास १५ नोव्हेंबरला विहाळ येथील भैरवनाथ शुगर या कारखान्यावर सकाळी ११ वाजता तीव्र आंदोलन करणार असल्याचे दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

दिलेल्या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, करमाळा तालुक्यातील ऊस शेतकऱ्यांची होत असलेली परवड व फसवणुक थांबविणेसाठी ऊस दर संघर्ष समितीने केलेल्या मागण्या योग्य आहेत. यामध्ये प्रमुख मागण्या खालीलप्रमाणे आहेत, तरी आमच्या मागण्या खालीलप्रमाणे…

१) भैरवनाथ कारखान्याचे 2017-18 च्या हंगामाचे 266 रुपये शेतकऱ्यांचे देणे बाकी आहे. हे 266 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर तात्काळ जमा करावेत व चालू हंगामाचे ऊस दर हा पहिली उचल 2500 व अंतिम दर हा 3100 रुपये जाहीर करावा  २) शेतकन्यांकडुन ऊसतोडणी कामगार व वाहतुकदार यांच्याकडुन भली मोठी रक्कम ऊसतोडणीसाठी घेतली जाते. या गोष्टी वाहतुकदारांना आपण आपल्या स्तरावर समजावून सांगाव्यात व शेतकऱ्यांची पिळवणुक करु नये अशी सक्त ताकीद त्यांना देणेत यावी. ३) गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार महामंडळ यांचेमार्फत ऊसतोड कामगारांचा पुरवठा मालकांची होत असलेली हत्या व फसवणुक थांबवावी अशी मागणी आपण साखर आयुक्त यांचेकडे करावी, जेणेकरून ऊस वाहतुकदारांची फसवणूक थांबण्यास मदत होईल.

तरी वरील मागण्या मान्य करुन ऊस उत्पादक शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्यावा, अन्यथा ऊस संघर्ष समिती सोलापूर जिल्हा व शेतकरी संघटना यांचेवतीने तीव्र स्वरुपाचे आंदोलन करण्यात येईल असाही इशारा दिला आहे. या आंदोलनाचे निवेदन तहसील कार्यालय करमाळा येथे देण्यात आले आहे. याप्रसंगी रयत प्रादेशिक सदस्य अजय बागल, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रवींद्र गोडगे, रयत क्रांतीचे जिल्हा संपर्कप्रमुख राजकुमार सरडे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष दीपक शिंदे, बळीराजा जिल्हा अध्यक्ष आण्णासाहेब सुपनवर, स्वाभिमानीचे करमा तालुका अध्यक्ष सुदर्शन शेळके, प्रहार चे तालुकाध्यक्ष संदीप तळेकर, रयत चे बाळासाहेब गायकवाड, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुका युवा अध्यक्ष अमोल घुमरे, मराठा सेवा संघाचे माने सर, स्वाभिमान शेतकरी संघटनेचे पक्ष तालुका अध्यक्ष बापू फडतडे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुका उपाध्यक्ष बापू वाडेकर, स्वाभिमानी शाखाध्यक्ष जातेगाव अशोक लवंगारे, स्वाभिमानी नेते मारुती निळ तसेच शेतकरी संघटनाचे पदाधिकारी व शेतकरी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!