पुरस्कार नेहमी नवीन कार्य करण्यास ऊर्जा देतात – प्रा.लक्ष्मण राख
करमाळा / संदेश प्रतिनिधी :
करमाळा : कार्य करत असताना विविध प्रकारचे पुरस्कार मिळत असतात, हे पुरस्कार विविध क्षेत्रात सामाजिक कार्य केल्याने मिळत असतात, कार्य करत राहणे हेच आपले कर्तव्य आहे चांगल्या कार्याला पुरस्कार नेहमीच प्राप्त होतात, असे मत यशवंतराव चव्हाण महाविद्यालय करमाळा येथील एन एस एस चे प्रमुख व राज्य समन्वयक प्राध्यापक लक्ष्मण राख यांनी व्यक्त केले.
राजीव गांधी सार्वजनिक वाचनालय रावगाव (ता.करमाळा) येथे आयोजित केलेल्या सत्कार समारंभ प्रसंगी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. रावगाव येथील डॉ. रवी जाधव यांना नुकतीच अलाहाबाद कृषी विश्वविद्यालय प्रयागराज उत्तर प्रदेश या विद्यापीठाची पीएचडी पदवी प्राप्त झाली आहे. तसेच पंडित जवाहरलाल नेहरू विद्यालय रावगाव येथील प्रताप बरडे यांना वर्थ वेलनेस फाउंडेशन नवी दिल्ली यांच्या वतीने देण्यात येणारा राष्ट्रीय प्रतिष्ठा पुरस्कार 2022 जाहीर झाला असून त्यानिमित्ताने या दोन्ही सत्कारमूर्तींचा सत्कार राजीव गांधी सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने करण्यात आला.
यावेळी प्रवीण बुधवंत पीएसआय कांदिवली पोलीस स्टेशन, भाऊसाहेब बुधवंत सर महात्मा गांधी विद्यालय करमाळा ,अशोक बरडे गुरूजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा धगटवाडी, हनुमंत रासकर सर पंडित जवाहरलाल नेहरू विद्यालय रावगाव, लालासाहेब जाधव तंटामुक्त समिती अध्यक्ष रावगाव, प्रशांत शिंदे आम आदमी पार्टी तालुका अध्यक्ष करमाळा, भरत धगाटे चेअरमन कृष्णाई दूध संकलन केंद्र रावगाव, अण्णासाहेब शिंदे मा.चेअरमन दूध संघ, हनुमंत पाटील छत्रपती क्रांती सेना तालुका अध्यक्ष करमाळा, शिवाजी बरडे माजी ग्रामपंचायत सदस्य,काकासाहेब पवार मा.उपसरपंच,बप्पा शिंदे नाभिक संघटना अध्यक्ष, बलभीम धगाटे सर, पै. दादा पवार, महादेव बुधवंत, किरण पवार, राहुल पवार, प्रकाश कांबळे, सखाराम लोंढे, भाऊराव पवार उपस्थित होते प्रस्ताविक भाऊसाहेब बुधवंत सर यांनी तर सुञसंचालन अशोक बरडे गुरूजी यांनी केले सर्व उपस्थितांचे आभार वाचनालयाचे सचिव भास्कर पवार यांनी मांनले.