केम मधील भैरवनाथ मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित
केम (प्रतिनिधी/संजय जाधव) : केम तालुका करमाळा येथील तळेकर गल्लीतील श्री भैरवनाथ मंदिरात दि.१६ रोजी भैरवनाथ जन्माष्टमी निमित्त विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित केले असल्याची माहिती मंदिराचे पुजारी सोपान तळेकर यांनी दिली.
या निमित्त सकाळी ८ वा. जागृत भैरवनाथ पायरीला अभिषेक करण्यात येणार आहे. सायंकाळी ९ ते १२ या वेळेत ह.भ.प.सौ. स्नेहा ताई भोसले,जेजुरी( झी टॉकीज फेम) यांचे जन्माचे कीर्तन होणार त्यानंतर महाप्रसाद वाटप करण्यात येईल तसेच गुरूवार दि १७रोजी सकाळी १० ते १२या वेळेत ह.भ.प. लालासाहेब चोपडे इंदापूर यांचे काल्याचे कीर्तन होईल. तरी भाविकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन भैरवनाथ मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.