वडार संघटनेच्या करमाळा तालुका अध्यक्षपदी विकास ननवरे यांची निवड - Saptahik Sandesh

वडार संघटनेच्या करमाळा तालुका अध्यक्षपदी विकास ननवरे यांची निवड

करमाळा ( संदेश प्रतिनिधी) : ‘मी वडार महाराष्ट्राचा’ या संघटनेची राज्याची बैठक नुकतीच मुंबई या ठिकाणी पार पडली. या बैठकीत हिसरे (ता.करमाळा) येथील विकास विठ्ठल ननवरे यांची करमाळा तालुकाध्यक्षपदी करण्यात आली.

ही बैठक मी महाराष्ट्र वडार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष विजय चौगुले यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली. यावेळी महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यातील व्यक्तींच्या जिल्हा आणि तालुका पातळीवर वेगवेगळ्या जबाबदाऱ्या देऊन त्यांच्या निवडी जाहीर करण्यात आल्या.

त्यावेळी करमाळा तालुका अध्यक्ष म्हणून विकास ननवरे यांची निवड मी वडार महाराष्ट्राचा या संघटनेचे सोलापूर जिल्हाध्यक्ष मा. दत्तात्रय गायकवाड (वस्ताद)यांच्या प्रमुख उपस्थितीत झाली. यावेळी या कार्यक्रमाला महाराष्ट्राच्या वेगळ्या भागातून जिल्ह्यातून मोठ्या संख्येत पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी प्रतिक्रिया देताना ननवरे म्हणाले की, मी वडार महाराष्ट्र संघटनेचा एक तालुका अध्यक्ष या नात्याने संघटनेची ध्येयधोरणे, संघटना मजबूत करणे आणि संघटनेचे विचार सर्व समाजातील घटकांपर्यंत पोहोचण्यासाठी प्रयत्न करीन आणि थोड्याच दिवसात संघटनेची करमाळा तालुक्याची कार्यकारणी देखील जाहिर केली असा आशावाद व्यक्त करण्यात केला.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!