सावित्रीबाई फुले बालसंगोपन योजना अंतर्गत एकल पालकांच्या मुलांना दरमहा २२५०/- मदत मिळणार
करमाळा / संदेश प्रतिनिधी :
करमाळा : सावित्रीबाई फुले बालसंगोपन योजना अंतर्गत अभिनव भारत समाज सेवा मंडळ सालसे यांचेवतीने ज्या मुलांचे आई किंवा वडील मयत आहेत अशा एकल पालकांच्या मुलांना शासनाच्या या योजनेअंतर्गत ० ते १८ वयोगट पर्येंत शासनाकडून मुलांना दरमहा २२५०/- मदत मिळणार आहे. त्यासाठी लवकरात लवकर दिलेल्या पत्त्यावर ५ मे २०२४ पर्यंत आपल्या मुलांचे अर्ज जमा करावेत असे आवाहन अभिनव भारत समाज सेवा मंडळाचे अध्यक्ष संतोष राऊत यांनी केले आहे.
यासाठी खालील कागदपत्रे आवश्यक आहेत..
- 1 अर्ज
- मुलांचे ID size फोटो (२)
- मुलांचे व पालकाचे एकत्रित घरासमोरील फोटो
- मृत्यू दाखला
- बँक पासबुक
- मुलांचे जन्म दाखला / बोनाफाईट
- मुलांचे आधार कार्ड
- सांभाळण्याचा पालकाचे आधार कार्ड
- रेशनकार्ड
- उत्पन्नाचा दाखला
एकाच कुटुंबातील दोन मुलांचे प्रस्ताव देता येतील. शासकीय योजनेचा लाभ न घेतल्याचे हमीपत्र अर्ज जमा करावयाचा पत्ता – १) सौ. सारिका पवार (८४३२८४३१७६) दत्त मंदिर शेजारी करमाळा २) विनायक सालगुडे (९५२७९५३७०७) ३.तुषार घोलप (८३२९२०००७४) अभिनव भारत समाज सेवा मंडळ, सालसे करमाळा परंडा रोड, सालसे