ऊत्तरेश्वर देवस्थानाला मिळाला तीर्थक्षेत्र ‘ब’ चा दर्जा – निधीतून विविध मंदिर विकासकामे केली जाणार
केम (प्रतिनिधी/संजय जाधव) : सोलापूर जिल्ह्यातील दहा देवस्थानांना नुकताच ‘ब’ दर्जा देण्यात आला असून त्यामध्ये केमचे ग्रामदैवत श्री उत्तरेश्वर देवस्थानाचा देखील समावेश करण्यात आल्याची माहिती माजी सरपंच अजित दादा तळेकर यांनी दिली.
‘ब’ दर्जा मिळाल्यामुळे श्री उत्तरेश्वर देवस्थान येथे भक्तनिवास स्वच्छ पाणीपुरवठा, मंदिराच्या परिसरात मार्बल फरशी बसवणे, संरक्षण भिंत स्ट्रीट लाईट गार्डन वाहनतळ मंदिर परिसर, सुशोभित करणे आदी कामे या माध्यमातून करण्यात येणार आहेत. या कामासाठी दोन कोटी रूपये मंजूर झाले आहेत. हा निधी लवकरच प्राप्त होणार आहे. या देवस्थान ची यात्रा दोन महिन्यावर आली आहे त्यामुळे निधी मिळताच कामाला सुरुवात होणार आहे.अशी माहिती माजी सरपंच अजितदादा तळेकर यांनी यावेळी दिली.
केम ग्रामपंचायतच्या माध्यमातून माजी सरपंच अजितदादा तळेकर यांनी या कामासाठी सतत पाठपुरावा केला होता. माजी आमदार नारायण आबा पाटील, भाजपाचे विधानपरिषद आमदार रणजीत सिंह मोहिते पाटील व सोलापूर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अनिरुद्ध कांबळे आदींच्या माध्यमातून हा ब दर्जा मिळाला असल्याचे तळेकर यांनी सांगितले.