खाजगी क्लासेस शिवाय शासकीय वैद्यकिय महाविद्यालयासाठी तेजस शिंदे याची निवड..

करमाळा / संदेश प्रतिनिधी :
करमाळा : वैद्यकिय महाविद्यालयात प्रवेश घ्यायचा म्हटलं की, ऑफलाइन क्लासेस लावावे लागतात. त्याला वर्षाकाठी किमान १ लाख रू. फि असते. याशिवाय मोठमोठ्या शहरात राहून पाठपुरावा करावा लागतो. तरीही अनेकांची निवड होत नाही. परंतू खडकी (ता. करमाळा) येथील तेजस भैरवनाथ शिंदे या विद्यार्थ्याने ऑनलाइन क्लासेस (अवघी ४ हजार रू. फी) अटेंड करून आणि घरीच अभ्यास करून नीट परीक्षा दिली व या परीक्षेत ५६० गुण मिळवून गर्व्हमेंट मेडिकल कॉलेज नंदूरबार येथे एमबीबीएससाठी निवड झाली आहे.
अकरावी, बारावीच्या अभ्यासाची पुस्तके चि. निरंजन बाळासाहेब यादव यांनी मोफत पुस्तके दिली होती. तेजस शिंदे याचे वडील शेतकरी असून खडकीचे माजी सरपंच आजिनाथ शिंदे यांचा तो नातू आहे. त्याच्या या निवडीबद्दल पुणे जिल्हा ग्राहक न्यायमंचाच्या सदस्या ॲड. संगीता यादव- देशमुख यांनी विशेष अभिनंदन केले आहे.

