नाईक निंबाळकर यांच्या प्रचारार्थ करमाळा तालुक्यात विविध 'प्रचार सभा' व पदयात्रा संपन्न - Saptahik Sandesh

नाईक निंबाळकर यांच्या प्रचारार्थ करमाळा तालुक्यात विविध ‘प्रचार सभा’ व पदयात्रा संपन्न

सावडी येथील प्रचार सभेतील छायाचित्र


करमाळा (संदेश प्रतिनिधी) – माढा लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रचारासाठी सोमवारी २२ एप्रिल व मंगळवारी २३ एप्रिल रोजी करमाळा तालुक्यात विविध प्रचार सभा व पदयात्रा संपन्न झाल्या. या प्रचार सभेत व रॅलीत करमाळा तालुक्याचे आमदार संजयमामा शिंदे यांच्यासह महायुतीतील सर्व घटक पक्षांचे नेते,कार्यकर्ते उपस्थित होते.

महायुतीमधील भाजपसह राष्ट्रवादी, शिवसेना , रासप, आरपीआय (ए), रयत क्रांती यांच्यासह सर्व मित्र पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत करमाळा तालुक्यात खासदार नाईकनिंबाळकर यांच्या प्रचारार्थ सभा व रॅली सोमवारी सावडी येथील नवीन मंगल कार्यालय येथे सकाळी ९ ते १२ या वेळेत सभा पार पडली.

यावेळी कोर्टी व केत्तूर गणातील गावांमधील नागरिक उपस्थित राहणार आहेत. दुपारी २ ते ५ यावेळेत करमाळा येथील विकी मंगल कार्यालयात होणाऱ्या सभेला करमाळा शहरासह पांडे, रावगाव व वीट गणातील नागरिक उपस्थित होते. त्यानंतर सायंकाळी ६ ते १० यावेळेत पदयात्रा निघाली. ही पदयात्रा संगम चौक ,सुभाष चौक, भवानी पेठ ,पोथरे नाका, जय महाराष्ट्र चौक, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक, गायकवाड चौक ,केतुर नाका या मार्गे गेली व त्याचा समारोप जुने कोर्ट येथे झाला.

मंगळवारी (ता. २३) सकाळी ९ ते १२ या वेळेत कंदर येथील साई कृपा मंगल कार्यालय येथे सभा झाली. यावेळी केम व वांगी गणातील नागरिक उपस्थित होते. त्यानंतर २ ते ५ या वेळेत साडे येथील कोटीलिंग मंगल कार्यालय येथे सभा झाली. यावेळी साडे व कुंभेज गणातील नागरिक उपस्थित होते. सायंकाळी ६ ते ९ या वेळेत चिखलठाण नं १ येथील श्रीनाथ मंगल कार्यालय येथे सभा झाली.

करमाळा येथील पदयात्रेची व्हिडीओ

“भाजपला मतदान म्हणजे आपल्या आदरणीय पंतप्रधान मोदीजींना मतदान हे लक्षात घेऊन सर्वांनी तिसऱ्यांदा मोदीजीना पंतप्रधान करण्यासाठी मा.रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना निवडून द्यावं”

-आमदार संजय मामा शिंदे

करमाळा शहरातील पदयात्रेमध्ये रणजित सिंह नाईक निंबाळकर, आ.संजय मामा शिंदे,महेश चिवटे, गणेश चिवटे, रामभाऊ ढाणे, जगदीश अग्रवाल, भरत अवताडे, उद्धव माळी, अर्जुनराव गाटे (आरपीआय), किरण बोकन, बाळासो कुंभार,दीपक चव्हाण, अफसर जाधव, सौ.राऊत , दत्तात्रय अडसूळ, भोजराज सुरवसे,सुजीत बागल, उदय ढेरे, ऍड अजित विघ्ने, सूर्यकांत पाटील तसेच महायुतीचे पदाधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!