गणेशोत्सवादरम्यान स्वराज्य ग्रुपने राबविले विविध सामाजिक उपक्रम - Saptahik Sandesh

गणेशोत्सवादरम्यान स्वराज्य ग्रुपने राबविले विविध सामाजिक उपक्रम

करमाळा (दि.२५) –  करमाळा शहरातील वेताळ पेठ मधील स्वराज्य ग्रुप प्रतिष्ठानच्यावतीने गणेशोत्सवानिमित्ताने विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात आले.

यामध्ये रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले. या शिबिराचे उद्घाटन पोलीस निरीक्षक विनोद घुगे  यांच्या शुभहस्ते संपन्न झाले. या रक्तदान शिबिरात एकूण 52 रक्तदात्यांनी सहभाग नोंदवला. तसेच मंडळातर्फे ह.भ.प.दिनेश महाराज किरवे यांचे कीर्तन आयोजित करण्यात आले. लहान मुलांच्या विविध स्पर्धा तसेच महिलांकडून “अथर्वशीर्ष” पठणाचा कार्यक्रम पार पडला. मंडळातर्फे महाप्रसादाचे उत्तम नियोजन करण्यात आले व साधारण 300 भक्तांना अन्नदान करण्यात आले.

नेहमीप्रमाणे यावर्षी देखील मंडळातर्फे “सजीव देखाव्याचे” प्रदर्शन करण्यात आले. यामध्ये “देशभक्त भगतसिंग यांचे बलिदान” या देखाव्याचे उत्तम सादरीकरण करण्यात आले व यास जनतेची उत्तम प्रतिक्रिया व प्रतिसाद मिळाला. गणेशोत्सवानिमित्त “श्री गणरायाची” मिरवणूक “आगमन व विसर्जन” अत्यंत साध्या पद्धतीने काढून, त्याऐवजी गोशाळेत मुक्या जनावरांना चाऱ्याचे वाटप करण्यात आले.

स्वराज्य ग्रुपचे अध्यक्ष प्रसाद काळे, उपाध्यक्ष पार्थ माळवे तसेच प्रताप रोडे, अनिकेत पोते , शंतनु कूलकर्णी, सक्षम दळवी, प्रतीक जगताप, सक्षम (किट्टू) ठोसर, कपिल नरतवडेकर, शुभम माळवे, सौरव शिंपी, साहिल अडसूळ, मृणाल देवी, प्रणव जोशी, सौरभ जाधव, अभिजीत सुरवसे, आशिष सुरवसे, आशिष चिवटे, पियूष शिंपी,महेश उबाळे, श्री ढाळे, स्वस्तिक शहाणे, शिवतेज रोडे तसेच गल्लीतील डॉ सुनील अडसूळ,आशिष शेठ मेहता, जयवंत नरतवडेकर, आबा अडसूळ, उमेश माळवे, योगेश शिंपी, या ज्येष्ठ मंडळी चे सहकार्य लाभले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!