वेदांत शिंदे याची नवोदय विद्यालयासाठी निवड

करमाळा(दि.२९) : जवाहर नवोदय विद्यालय परीक्षेचा निकाल नुकताच जाहिर झाला असून श्री देवीचामाळ येथील वेदांत सचिन शिंदे याची इयत्ता सहावीच्या प्रवेशासाठी निवड झाली आहे. नवोदय परीक्षेमध्ये यश संपादन केल्यामुळे त्याला 6 वी ते 12 वी पर्यंत सीबीएससी बोर्डाचे शिक्षण मोफत मिळणार आहे.

वेदांतचे कुटुंब हे देवीचामाळ येथे राहत आहे. त्याचे वडील बांधकाम व्यावसायिक असून आई शिक्षक आहे. वेदांतचा मोठा भाऊ सोहम, तसेच चुलत बंधू समर शिंदे याचीही नवोदय विद्यालयात २०२१ ला निवड झाली होती. मोठ्या भावाचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून त्याने ही जिद्दीने अभ्यास करून हे यश संपादन केले. याबद्दल त्याचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
‘जवाहर नवोदय विद्यालय ही १००% केंद्र शासन अनुदानीत विद्यालय आहेत. प्रत्येक जिल्ह्यात एकच हे विद्यालय असते. सोलापूर जिल्ह्यात मोहोळ तालुक्यातील पोखरापूर येथे हे नवोदय विद्यालय आहे. इयत्ता ६ वी व इयत्ता ९ वी साठी या विद्यालयात पात्रता परीक्षा देऊन प्रवेश घेता येतो. येथील शिक्षण सिबीएसई पॅटर्नमध्ये घेतले जाते.





