कोणत्याही क्षेत्रात खेड्यातील विद्यार्थी कमी नाहीत – कॅप्टन भारत नवले
राजुरी / संदेश प्रतिनिधी :
राजुरी: कोणत्याही क्षेत्रात खेड्यातील विद्यार्थी कमी नाहीत,प्रत्येक क्षेत्र ग्रामीण भागातील युवकांनी गाजवले आहे. त्यामुळे खेड्यातील विद्यार्थ्यांनी स्वतःला कमी लेखू नये असे अवाहन नेव्ही मर्चंट मधील कोर्टी येथील कॅप्टन भारत नवले यांनी केले.
राजुरी येथील राजेश्वर विद्यालय आयोजित केलेल्या करियर मार्गदर्शन व्याख्यान मालेत ते बोलत होते.
राजेश्वर विद्यालयातील माजी विद्यार्थी संघटनेच्या संकल्पनेतून व्याख्यानमालेचे आयोजित केले होते. 6 डिसेंबरला मर्चंट नेव्ही मध्ये कार्यरत असलेले कॅप्टन भरत विठ्ठल नवले याचे व्याख्यान आयोजित केले होते.. नवले म्हणाले की, कोणत्याही क्षेत्रात खेड्यातील विद्यार्थी कमी नाहीत. मनात न्यूनगंड बाळगू नका असेही त्यांनी म्हटले.
या कार्यक्रम प्रसंगी राजेश्वर विद्यालयाचे मुख्याध्यापक अनिल झोळ, विलास जाधव, शांतीलाल वलटे,मारुती साखरे, धनंजय साखरे, रत्नाकर तळेकर, सौ. विद्या कोल्हे-तळेकर, विजय गरड, गंगाराम वाघमोडे, जगन्नाथ अवघडे, कल्याण बागडे,अमोल कोल्हे, योगीराज पवार आदि मान्यवर व विद्यार्थी- विद्यार्थिनी उपस्थित होते.