गौंडरे येथील धर्मवीर संभाजी विद्यालयाचे शिष्यवृत्ती परीक्षेत सुयश - Saptahik Sandesh

गौंडरे येथील धर्मवीर संभाजी विद्यालयाचे शिष्यवृत्ती परीक्षेत सुयश

करमाळा / संदेश प्रतिनिधी :

करमाळा : गौंडरे (ता.करमाळा) येथील धर्मवीर संभाजी विद्यालयाचे सलग तिसऱ्या वर्षी इयत्ता पाचवी ते आठवी शिष्यवृत्ती परीक्षा पास होऊन विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळणार आहे. शैक्षणिक वर्ष 2022-23 याही वर्षी विद्यार्थी शेळवणे श्रावणी अधिकराव इ.पाचवी, तुषार धनाजी हनपुडे इ.आठवी, आदित्य नारायण नलबे इ.आठवी या तिन्ही विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती परीक्षा पास होऊन यांनी शिष्यवृत्ती मिळविण्याचा मान मिळविला आहे. या तीन्ही विद्यार्थ्यांचा धर्मवीर संभाजी विद्यालयाच्यावतीने अभिनंदन करून सत्कार करण्यात आला. याप्रसंगी विद्यालयाचे मुख्याध्यापक, शिक्षक आदिजण उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!