यशवंतराव चव्हाण महाविद्यालयामध्ये फिरत्या चषकाचे स्वागत…
करमाळा / संदेश प्रतिनिधी :
करमाळा : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ सोलापूर अंतर महाविद्यालयीन क्रिकेट स्पर्धा दि २ जानेवारी ते १४ जानेवारी 2023 अखेर यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाच्या क्रीडांगणावरती संपन्न होणार आहेत.
या स्पर्धेत पु अ हो सोलापूर विद्यापीठ संलग्नित महाविद्यालये सहभागी होणार आहेत. सदर स्पर्धेमध्ये प्रथम विजेत्या संघास दिला जाणारा फिरता ‘राजे जन्मजेय भोसले ‘ चषक चे आज यशवंतराव चव्हाण महाविद्यालयामध्ये स्वागत करण्यात आले. सदरचा फिरता चषक छत्रपती शिवाजी महाविद्यालय बार्शी चे क्रिडा संचालक डॉ.आर.एस. नागटिळक घेऊन हजर झाले.
ज्याचे स्वागत संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य मिलिंद फंड, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एल.बी.पाटील, वरिष्ठ विभागाचे उपप्राचार्य डॉ .अनिल साळुंखे,महाविद्यालयाचे क्रिडा संचालक डॉ.अतुल लकडे, पी .एम.पी.एम चे क्रिडा संचालक प्रा. वाघमारे,कनिष्ठ विभागाचे उपप्राचार्य कॅप्टन संभाजी किर्दाक, राष्ट्रीय सेवा योजनेचे जिल्हा समन्वयक प्रा .लक्ष्मण राख, कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी केले.