नामांकित संघांना नमवत करमाळ्याचा गजानन क्रिकेट संघ विजेता - Saptahik Sandesh

नामांकित संघांना नमवत करमाळ्याचा गजानन क्रिकेट संघ विजेता

करमाळा- येथील जीन मैदान येथे झालेल्या टेनिस बाॅल च्या एकदिवसीय स्पर्धेत अंतिम सामन्यात दहिगाव संघाला नमवत गजानन क्रिकेट संघ विजयी ठरला आहे.

या स्पर्धेत करमाळा तालुक्यातील आठ प्रमुख संघांनी सहभाग नोंदविला होता. अंतिम सामन्यात रोहित परदेशी, अमित बुद्रुक,मिलिंद दामोदरे ,अविनाश सावंत यांच्या चमकदार कामगिरीने आणि गजानन संघातील सर्व खेळाडूंनी केलेल्या चांगल्या कामगिरीच्या जोरावर प्रथम पारितोषिक पटकावले.या सामन्यांचे नियोजन कमलेश कदम ,समीर सय्यद ,बंटी भडंगे,बापू सावंत,शकुर भाई ,उमेश सुरवसे,सचिन गायकवाड यांनी केले तर समालोचन शाहरुख मुलाणी, अक्षय कांबळे यांनी केले तर पंच म्हणून रितेश कांबळे आणि मयूर कांबळे यांनी पाहिले.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!