झोळ फाऊंडेशनच्या वतीने करिअर मार्गदर्शनासाठी ऑनलाइन कार्यशाळेचे आयोजन
केम (संजय जाधव) : करमाळा तालुक्यातील विद्यार्थी शैक्षणिक दृष्ट्या संपन्न झाला पाहिजे त्यासाठी विद्यार्थ्यांना करिअर मार्गदर्शन ही काळाची गरज असून प्रा.रामदास झोळ फाउंडेशन करमाळा यांच्या वतीने करमाळा तालुक्यातील विद्यार्थि व पालकांसाठी साठी दहावी-बारावी नंतर पुढे काय? याविषयी करियर मार्गदर्शन कार्यशाळा ऑनलाइन घेण्यात येणार आहे.
या कार्यशाळेत तुम्ही घरी बसून सहभागी होऊ शकता. यामध्ये दहावी बारावी पास झाल्यानंतर पुढे शिक्षणाच्या कुठल्या संधी आहेत,प्रवेश प्रक्रिया कशी असते, CET कोणकोणत्या आभ्यासक्रमाला असते,प्रवेशाचे राऊंड किती व कसे असतात,स्कॉलरशिप कुणाला मिळते,कागदपत्रे कुठली लागतात या याबद्दल चे सखोल मार्गदर्शन या कार्यशाळेमध्ये केले जाणार आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना याबद्दलची माहिती खूप कमी प्रमाणात असते. त्यामुळे जगाच्या स्पर्धेमध्ये करमाळा तालुक्याचा विद्यार्थी मागे पडत आहे. या विद्यार्थ्याला योग्य दिशा मार्गदर्शन करून त्याला अपेक्षित असणाऱ्या शाखेमध्ये करिअरची योग्य दिशा मिळून, योग्य शिक्षण मिळाल्यामुळे चांगल्या ठिकाणी नोकरी मिळू शकते आणि तो आत्मनिर्भर होऊन त्याच्या कुटुंबाचा उत्कर्ष करील या उद्देशाने प्रा. रामदास झोळ फाउंडेशन ने ऑनलाइन करियर कार्यशाळेचे आयोजन केले आहे. नावनोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांना ग्रुपमध्ये समाविष्ट करून झूम मीटिंग द्वारे एका वेळी दोनशे ते तीनशे विद्यार्थ्यांना व पालकांना मार्गदर्शन करण्यात येणार आहे. याबाबत आपले काही प्रश्न असल्यास त्या प्रश्नांची उत्तरेही दिली जाणार आहेत.
करमाळा तालुक्यातील हजारो विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्याचा प्रा. रामदास झोळ फाऊंडेशनचा उपक्रम आहे. त्यामुळे जगाच्या स्पर्धेमध्ये करमाळा तालुक्यातील विद्यार्थी सक्षमपणे उभा राहण्यास पात्र होणार आहे. तरी दहावी बारावीनंतर पुढे काय? या करिअर मार्गदर्शन कार्यशाळेसाठी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी व पालकांनी नाव नोंदणी करून कार्यशाळेत सहभागी व्हावे. असे आवाहन प्रा. रामदास झोळ सर यांनी केले आहे
नाव नोंदणीसाठी संपर्क – प्रा. रामदास झोळ फाउंडेशन संपर्क कार्यालय बारा बंगले विकासनगर करमाळा
संपर्क – 9405314296 (कॉलिंग), 7744009095 (व्हॉटस् ॲप)