सावंतगल्ली एकसंघ का ?

माझी डायरी…!
सावंतगल्ली आणि आमचं नातं हे फॅमिली गेस्टप्रमाणे आहे. फॅमिली डॉक्टर ज्याप्रमाणे ठराविक फॅमिलीची वैद्यकिय काळजी घेतो त्याप्रमाणे या गल्लीतील कोणताही कार्यक्रम असो, त्यासाठी एक घरचा पाहूणा म्हणून सावंतगल्लीचेही निमंत्रण असते आणि आम्हीही हजर असतो. सावंतगल्लीतील युवा नेते मंडळीपासून ते कै.डि.के. सावंत भाऊ, कै.अनंतराव सावंत आबा, कै.सुभाषराव सावंत आण्णा या सर्वांबरोबर कायम संपर्क आलेले आहेत. इतरांचे अनुभव पाहत असताना सावंतगल्ली एकसंघ का ? याचे उत्तर मला गेल्या आठवड्यात मिळाले.
सावंतगल्लीतील केशव मोरे यांची जमीन सहा वर्षापूर्वी खरेदी केली होती. त्या जमिनीतून कुकडी कॅनॉल गेला आहे. कुकडी कॅनॉलची येणारी रक्कम आम्हाला मिळावी ही अपेक्षा मोरे परिवाराची होती. त्यानूसार त्यांना आवश्यक तेथे संमतीपत्रही दिले होते. आणखी एकदा त्यांना संमतीची गरज होती. काही अडचणीमुळे संमती थोडी लांबत चालली होती.
दरम्यान गेल्या आठवड्यात मा.नगरसेवक संजय सावंत यांचा फोन आला व मला भेटायला यायचं आहे. त्यावेळी त्यांना या म्हणून सांगितले. त्यानंतर श्री. सावंत हे कार्यालयात आले आणि त्यांनी मोरे यांच्या संमतीचा विषय काढला त्यावेळी त्यांना संमतीबाबत अडचण नाही, परंतू जी संपादीत झालेली जमीन आहे तेवढी जमीन सोडून त्यांनी खरेदी केलेली जमीन मोजून द्यावी; ही अपेक्षा आहे. त्यावर त्यांनी एका सेकंदाचाही विचार न करता, एकदम बरोबर आहे.
आपण ती जमीन तुम्हाला मोजून देऊ. त्यानंतर जमीन मोजण्याचा निर्णय ठरला तोही चक्क मकरसंक्रांतीचा दिवस होता. वडगावचे जगदाळे यांना बोलविले आणि सकाळी दहा वाजल्यापासून दुपारी दोन पर्यत मोजणीचे काम चालू होते. विशेष म्हणजे मोजणी सुरू झाली तेव्हापासून संपूर्ण मोजणी होईपर्यंत संजय सावंत तसेच त्यांचे अन्य मित्र यावेळी उपस्थित होते. त्यांनी कुकडीच्या अधिकाऱ्याला विचारून जेवढी संपादीत जमीन आहे तेवढी बाजूला काढून उर्वरित क्षेत्र मोजले. जेवढे कमी भरले तेवढे श्री. मोरे यांना तात्काळ देण्यास सांगितले आणि मोरे यांनीही ते लगेच मोजून ताब्यात दिले.
हकीकत सांगायला ही सहज सोपी असलीतरी ती इतकी सहज नाही. छोट्या छोट्या गोष्टीसाठी कोर्टातील फेऱ्या कशा असतात हे आम्ही वर्षानुवर्षे पाहतो. परंतू सावंत गल्लीतील विठ्ठल आप्पा सावंत, भगवान नाना सावंत, गोपाळ बापू सावंत, दादासाहेब सावंत यांच्या पाठोपाठ मा.नगरसेवक संजय सावंत, सुनील बापू सावंत, पंचायत समिती सदस्य ॲड.राहुल सावंत ही मंडळी कोणाचेही काम असो तात्काळ आणि नियमबध्द करतात. कोणाचीही बाजू न घेता सत्य आणि स्पष्ट निर्णय देतात. त्यामुळे त्याचा फायदा इतरांना तर होतोच पण गल्लीतील कोणाचेही कोणतेही काम आडत नाही. म्हणूनच सावंतगल्ली एकसंघ का ? याचे उत्तर यानिमित्ताने समजले.
✍️डॉ.अॅड.बाबूराव हिरडे,करमाळा, मो.९४२३३३७४८०
