केम येथील मंदाकिनी बिचीतकर यांचे अल्पशा आजाराने निधन - Saptahik Sandesh

केम येथील मंदाकिनी बिचीतकर यांचे अल्पशा आजाराने निधन

केम (प्रतिनिधी/संजय जाधव) – केम (ता. करमाळा) येथील मंदाकिनी भाऊसाहेब बिचीतकर यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. मृत्यू समयी त्यांचे वय वर्षे ५४ होते.

त्यांच्या पश्चात दोन मुले, एक मुलगी, सुना नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्या अंत्यसंस्काराच्या वेळी मोठया प्रमाणावर नागरिकांची उपस्थिती होती.अभिमन्यू शिक्षण प्रसारक मंडळ,केम या संस्थेचे सचिव भाऊसाहेब बिचितकर यांच्या त्या पत्नी होत्या. त्यांच्या निधनाने केम परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!