
करमाळा /संदेश प्रतिनिधी
करमाळा, ता.७: पोथरे येथील बाळकृष्ण दादा झिंजाडे-पाटील (वय-72) यांचे अल्पशा आजाराने आज(ता.७) निधन झाले. त्यांच्यावर पुणे येथे खाजगी रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचार चालू असताना त्यांचे निधन झाले आहे. ते एक आदर्श शेतकरी म्हणून परिचित होते. त्यांचे मागे एक भाऊ, बहीण दोन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे. मेजर सतिश झिंजाडे-पाटील व सचिन झिंजाडे-पाटील यांचे वडील होत. बुधवार (दि.८) दुपारी 12 वाजता पोथरे येथे राहत्या घरी पाटील-वस्तीवर त्यांचा अंत्यविधी पार पडला. यावेळी सर्व स्तरातील नागरिक यावेळी उपस्थित होते.
