केम येथील हनुमंत बिचितकर यांचे निधन

केम | संजय जाधव: करमाळा तालुक्यातील केम येथील वारकरी संप्रदायाचे ज्येष्ठ पाईक हनुमंत प्रल्हाद बिचितकर यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. निधनसमयी त्यांचे वय ७० वर्षे होते.
त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे.
त्यांच्या निधनाची बातमी समजताच केम व परिसरातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
