स्त्रियांनी स्वतः साठी वेळ दिला पाहिजे – संतोष राऊत

करमाळा(दि.१६) : आई हीच पहिला गुरु असते, आपल्या मुलांना चांगला वाईट स्पर्श शिकवला पाहिजे तसेच चांगल्या सवयी लावल्या पाहिजे. शारीरिक आणि मानसिक बदल विश्वासात घेऊन स्वीकारले पाहिजेत महिलांमध्ये आरोग्याचे खूप प्रश्न आहेत. त्यात त्यांना प्रचंड कष्टाची कामे करावी लागतात. हिमोग्लोबिन, आयर्न अशा गोष्टीची कमतरता जाणवून वेगवेगळ्या आजाराला सामोरे जावे लागते. स्त्री सर्व क्षेत्रात सध्या भरारी घेत आहे. त्यासोबत आपल्या कुटुंबाची सर्व जबाबदारी योग्य रीतीने सांभाळत असते. या धावपळीत तिने स्वतः साठी वेळ दिला पाहिजे असे प्रतिपादन सामाजिक कार्यकर्ते व अभिनव भारत समाज सेवा मंडळ संस्थेचे अध्यक्ष संतोष राऊत संतोष राऊत यांनी व्यक्त केले.
८ मार्च रोजी जागतिक महिला दिनानिमित्त हेरीटेज फूड लिमिटेड व अभिनव दुध संकलन, सालसे या दुध उत्पादक कंपनीने सालसे गावातील वेगवेगळ्या व्यवसायात अग्रेसर असणाऱ्या महिलांचा सत्कार केला. यावेळी ते बोलत होते.
या मध्ये हेरीटेज फुड्स लिमिटेड या कंपनी तर्फे अभिनव दुध संकलन च्या व्यवस्थापकका वैशाली राऊत यांचा सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला. या प्रसंगी हेरीटेज फुड्स लिमिटेड BMC अंतर्गत दुध संकलन अधिकारी रामेश्वर गाढवे, अनिल बेडकुते व समाधान घोगरे उपस्थित होते. उद्योजक हरिचंद्र थोरे, बायडाबाई थोरे, शरद पवार व कविता पवार, दुध उत्पादक शेतकरी रेश्मा पोळ, श्रीकांत कोळी, आदित्य पोळ, विनोद पोळ व महादेव येवले. आदि लोक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दशरथ कोळी केले तर आभार हनुमंत पवार यांनी मानले.





