शिवकिर्ती इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये वार्षिक स्नेहसंम्मेलन मोठया ऊत्साहात संंपन्न

केम(संजय जाधव) : केम (ता.करमाळा) येथील शिवकिर्ती इंग्लिश मिडीयम स्कूल मध्ये शनिवार दि.१५ मार्च रोजी वार्षिक स्नेहसंम्मेलन उत्साहात साजरे करण्यात आले.
कार्यक्रमाच्या सुरवातीला उपस्थित मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेचे पूजन व दिप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी वसंत तळेकर,मनोज तळेकर,नागनाथ तळेकर, सागरराजे दोंड, सागरराजे तळेकर, श्री संदीपान गुटाळ, आनंद शिंदे, पत्रकार सचिन बीचीतकर , दिनेश दुधे, नागनाथ खूपसे, समाधान कळसाईत,राहुल कोंडलकर, राघू कोंडलकर, राजेंद्र कोंडलकर, सागर पवार , ज्ञानदेव कोडलिंगे, गणेश कोडलिंगे आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थापक सुहास काळे सर यांनी केले प्रास्ताविकातून त्यांनी शाळा राबवत असलेल्या उपक्रविषयी व येत्या शैक्षणिक वर्षापासून अबॅकस, संगीत व धनुर्विद्या इत्यादी उपक्रम शाळा सुरू करणार असल्याचे सांगितले. उपस्थित मान्यवरांनी शाळेतील उपक्रमांचे कौतुक करत शाळेच्या पुढील वाटचालीस भरभरून शुभेच्छा दिल्या.
इयत्ता नर्सरी ते पाचवीच्या विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवराय, शेतकरी गीते, कोळीगीते, विनोदी गीते अशा प्रकारच्या एकुण २९ गाण्यावर बहारदार नृत्य सादर करून उपस्थितांची मने जिंकली. उपस्थितीत मान्यवर व पालक यांनी भरघोस बक्षिसांचा वर्षाव केला.

हा कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी संस्था अध्यक्ष संदीप काळे सर सचिव दत्तात्रय काळे ,मुख्याध्यापिका सौ. रेणूका काळे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली शितल काळे, माधुरी देवकर, सोनल सलगर, मोनिका परदेशी, कुलकर्णी मॅडम, अनिकेत रोकडे, सूरज गोडगे आदींनी परिश्रम घेतले.





