पाकिस्तानी अतिरेक्यांना जशास तसे उत्तर देऊन देशवासीयांना न्याय मिळवून द्यावा – यशपाल कांबळे

0

करमाळा(दि.६): पाकिस्तानी अतिरेक्यांना जशास तसे उत्तर देऊन देशवासीयांना न्याय मिळवून द्यावा असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा नेते यशपाल कांबळे यांनी केले. पहलगाम येथे आतंकवाद्याकडून भारतीयांवर जो गोळीबार करण्यात आला त्याच्या निषेधार्थ व त्यामध्ये शहीद झालेल्या भारतीयांना श्रद्धांजली म्हणून यशपाल कांबळे यांच्या नेतृत्वाखाली वंचित बहुजन आघाडी च्या वतीने २८ एप्रिल रोजी करमाळा बंद पुकारण्यात आला होता. यावेळी ते बोलत होते.

यावेळी पाकिस्तानचे झेंडे जाळून भारत माता की जय घोषणा देण्यात आल्या. पुढे बोलताना यशपाल कांबळे आपल्या भाषणात म्हणाले की पहलगाम येथे जे भारतीय थंड हवेचे ठिकाण म्हणून गेलेल्यांवर पाकिस्तानी आतंकवाद्यांनी बेछूट गोळीबार करत भारतीयांची हत्या केली त्याचा आम्ही जाहीर निषेध करीत आहोत
जे आतंकवादी होते त्यांच्यावर त्याच पद्धतीने उत्तर भारतीय सेनेने द्यावे तसेच पाकिस्तान ते पहलगाम कश्मीर यामधील अंतर 662 किलोमीटरचा आहे तर हे आतंकवादी आलेच कसे आल्यानंतर गोळीबार करून व्यवस्थित पाकिस्तानात गेले कसे?यामध्ये कोण जबाबदार असतील त्यांच्यावर देखील राष्ट्र द्रोहाचे गुन्हे दाखल करत देह दंडाचे शिक्षा देण्यात यावी.

पुलवामा मध्ये जो आतंकवादी अटॅक झाला तिथे 450 किलो आरडीएक्स आले कुठून? हा प्रश्न पूर्ण देश वासियांकडून विचारला जात होता. त्याचा खुलासा सरकार आद्यपर्यंत देऊ शकलेलं नाही. पण गुगलमध्ये अशी माहिती कळते की पुलवामा अटॅक च्या वेळी जो एसीपी होता ( वीरेंद्र सिंग ) हा पाकिस्तानी अतिरेक्यांसोबत काही महिन्यापूर्वीच पहिलगाम याच ठिकाणी सापडलेला आहे. ह्या दोन्ही घटना पूर्वनियोजित असू शकतात असा आमचा प्रश्न आहे. तात्काळ याची जर सर्व जबाबदारी सरकारने घ्यावी व पाकिस्तानी अतिरेक्यांना जशास तसे उत्तर देऊन देशवासीयांना न्याय मिळवून द्यावा असे आवाहन यशपाल कांबळे यांनी केले.

यावेळी करमाळा बंदला मराठा सेवा संघ सकल मुस्लिम समाज मातंग एकता आंदोलन ब्ल्यू पॅंथर ग्रुप अशा विविध संघटनांनी पाठिंबा जाहीर केला यावेळी करमाळा वासियांनी 100% बंद पाळून भारतीय शहिदांना श्रद्धांजली वाहिली.

सुलेखन– प्रशांत खोलासे, केडगाव(ता.करमाळा)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!