यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात डॉ.ए.पी. जे.अब्दुल कलाम जयंती साजरी
करमाळा / संदेश प्रतिनिधी :
करमाळा : येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांची जयंती साजरी करण्यात आली. त्यानिमित्ताने वाचन प्रेरणा दिवस साजरा करण्यात आला.
हा कार्यक्रम महाविद्यालयातील विद्यार्थी अबुतालीब शेख यांचे अध्यक्षतेखाली संपन्न झाला. यावेळी प्रमुख पाहूणे म्हणून विद्यार्थीनी सुप्रिया पवार व अमित सरवदे हे होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन विद्यार्थी दिपाली राऊत यांनी केले. प्रास्ताविक भाग्यश्री बिनवडे यांनी केले. यावेळी अमन आरणे, रामेश्वर भरते, सूरज सुपे, साक्षी शिंदे, प्रतिक्षा पवार, अपर्णा शिंदे, अंकिता वाबळे व प्राची हिंगणे या विद्यार्थीनींनी आपले मत व्यक्त केले.
अध्यक्ष अबुतालीब शेख यांचेही यावेळी भाषण झाले. अमृता आरणे हिने आभार मानले. या कार्यक्रमाचे निरीक्षण महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एल. बी. पाटील, उपप्राचार्य डॉ. अनिल साळुंके, प्रा. प्रदीप मोहिते, ग्रंथालय विभाग प्रमुख श्रीमती डॉ. रामटेके यांनी केले. यावेळी विद्यार्थ्यांनी अतिशय परिपूर्ण असा हा कार्यक्रम सादर केला. प्राचार्य डॉ. पाटील यांनी या सर्व विद्यार्थ्यांचे विशेष अभिनंदन केले आहे.