उत्तम आरोग्य व मनाच्या शुद्धतेसाठी योग प्राणायाम आवश्यक – योग शिक्षक रामचंद्र कदम
करमाळा / संदेश प्रतिनिधी :
करमाळा : उत्तम आरोग्य व मनाच्या शुद्धतेसाठी नियमित योग व प्राणायाम करणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन योग शिक्षक रामचंद्र कदम यांनी शेटफळ ता करमाळा येथे पतंजली योग समिती करमाळा व येथील जिव्हाळा ग्रुपच्या वतीने आयोजित तीन दिवसीय योग व प्राणायाम शिबीराच्या समारोप प्रसंगी बोलताना केले.
यावेळी भारत स्वाभिमानचे जिल्हा प्रभारी सुरेंद्र पिसे व मधुकर सुतार उपस्थित होते पुढे बोलताना कदम म्हणाले की योग व प्राणायाम ही भारतीय संस्कृतीची देणगी आहे.अनादी काळापासून याचे महत्त्व अधोरेखित केलेले आहे. योग व प्राणायाम फक्त तीन दिवसांसाठी करण्याची गोष्ट नाही याचा परिणाम जाण्यासाठी सातत्य ठेवण्याची गरज आहे.तीन दिवस चाललेल्या शिबीरात योग शिक्षक हानुमानसिंह परदेशी , राजेंद्र काळे, प्रविण देवी यांनी मार्गदर्शन केले.
गावात नियमीत योग वर्ग सुरू ठेवण्यासाठी ग्राम समीतीची स्थापना करण्यात आली सांगता कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गजेंद्र पोळ यांनी केले तर आभार प्रशांत नाईकनवरे यांनी मानले कार्यक्रमाच्या .वेळी प्रसिद्ध किर्तनकार विठ्ठल पाटील महाराज, राजाभाऊ रोंगे,बापू नाईकनवरे, पतंजली चे तालुका प्रभारी बाळासाहेब नरारे महाराज विलास लबडे , मुरलीधर पोळ, अशोक लबडे, महावीर निंबाळकर, शिवाजी पोळ, साहेबराव पोळ,भारत लोकरे, राजेंद्र साबळे, चंद्रकांत पवार, माऊली पाटील वैभव पोळ, हंबीरराव नाईकनवरे विजय लबडे, , संतोष घोगरे, नानासाहेब साळूंके यांच्यासह परिसरातील बहुसंख्य लोक उपस्थित होते.