वांगी नं 1 येथे सर्व रोग निदान शिबिराचे उदघाटन संपन्न
करमाळा (संदेश प्रतिनिधी) : आज (दि.२) वांगी १(ता.करमाळा) येथील जिल्हा परिषद सदस्य श्री निळकंठ( आप्पा )देशमुख युवा मंच यांच्यावतीने गावात सर्व रोग निदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.
यावेळी इशा आय केअर अँड ऑप्टिकल करमाळा व टेके आय केअर क्लिनिक सांगली यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत ऑपरेशन शिबिराचे उद्घाटन झाले.
या शिबिरात नेत्र चिकित्सा, स्त्रियांचे आजार व बालरोग तज्ञ यांच्याकडून तपासणी करण्यात आली. तसेच महात्मा फुले योजनेअंतर्गत रुग्णांना वैद्यकीय शस्त्रक्रियेसाठी मोफत उपचार करून देण्यात येणार आहेत.
यावेळी वांगीचे युवा नेते उदयसिंह (भैया) देशमुख ,वांगीचे सरपंच संतोष देशमुख,श्री दिगंबर भाऊ देशमुख, श्री रावसाहेब देशमुख, श्री भारत दादा देशमुख, श्री दत्ता (बापू) देशमुख ग्रामपंचायत सदस्य ,श्री तानाजी काका देशमुख ग्रामपंचायत सदस्य, श्री विष्णुपंत वाघमारे ,श्री आबासाहेब देशमुख, दिलीप पाटील, मधुकर पाटील,दत्ता देशमुख सुरज चव्हाण, सनी देशमुख, अशोक पाटील ,चांद आतार व वांगी चे उपसरपंच ज्ञानेश्वर ढावरे उपस्थित होते.
हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी प्रीपल्स डेव्हलपमेंट फाउंडेशनचे अध्यक्ष श्री ज्ञानदेव काकडे ,उदयसिंह (भैया) देशमुख, विष्णुपंत वाघमारे, ज्ञानेश्वर ढावरे, सनी देशमुख, आबा देशमुख, यांनी सहकार्य केले.