धनगर समाजाला आरक्षणाच्या मागणीसाठी युवकाचे बायपास पुलावर आंदोलन -

धनगर समाजाला आरक्षणाच्या मागणीसाठी युवकाचे बायपास पुलावर आंदोलन

0

करमाळा, ता.९:  शहराजवळील अहिल्यानगर–टेंभुर्णी बायपास रोडवरील अर्धवट बांधलेल्या पुलावर चढून एका युवकाने धनगर समाजाला एस.टी. प्रवर्गातून आरक्षण मिळावे, या मागणीसाठी  ४ नोव्हेंबर २०२५ रोजी दुपारी आंदोलन केले.

या घटनेची माहिती मिळताच करमाळा  पोलीस पथकाने घटनास्थळी धाव घेतली. त्यावेळी संबंधित युवक “धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण मिळालेच पाहिजे”, “आरक्षण आमचे हक्काचे नाही, कुणाचे बापाचे ”, “यळकोट यळकोट जय मल्हार” अशा घोषणा देत पुलावर उभा होता.

सदर ठिकाणी मोठ्या प्रमाणात लोकांची गर्दी झाल्याने कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये. म्हणून चोख बंदोबस्त ठेवला.

घटनास्थळी तत्काळ अँब्युलन्स व अग्निशमन दलाला देखील सतर्कतेसाठी बोलावण्यात आले. त्याचबरोबर तहसीलदार तथा तालुका दंडाधिकारी श्रीमती शिल्पा ठोकडे आणि महसूल अधिकारी राजेंद्र पांडेकर हेही घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी आंदोलनकर्त्याशी संवाद साधून त्यास खाली उतरविण्याचा प्रयत्न केला.

बराच वेळ समजुतीने बोलल्यानंतर प्रशासनाने आंदोलनकर्त्याचे मागणीसंदर्भात लेखी निवेदन स्वीकारले. त्यानंतर युवकाने आंदोलन मागे घेतले.


या घटनेमुळे काही काळ बायपास रस्त्यावर वाहतूक विस्कळीत झाली होती. मात्र, पोलिसांच्या तत्परतेमुळे कोणताही अप्रिय प्रकार घडला नाही.सदर प्रकरणी पोलीस नाईक गणेश सुभाष दळवी  यांनी  फिर्याद नोंदवली असून, पुढील तपास  पोलिस करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!