शिक्षक…म्हणजे तरी कोण?
शिक्षक…शिक्षक…शिक्षक…म्हणजे तरी कोण?
मातीच्या गॊळ्याला आकार देणारा कुंभार असतो
सातत्याने नाविन्याचा शोध घेणारा संशोधक असतो…
हसून नाचून शिकवणारा अभिनेता असतो
ज्ञानाचा मळा फुलविणारा माळी असतो
अज्ञानाच्या काळोखात ज्ञानरूपी प्रकाश देणारा तेजस्वी तारा असतो…
संस्कारक्षम विद्यार्थी घडविणारा तो शिल्पकार असतो…
मुलात मूल होऊन खेळणारा आजन्म विद्यार्थी असतो…
खरंच शिक्षक म्हणजे कोण असतो…?
शिक्षक असतो मार्गदर्शक, संकटात कायम सोबत राहणारा चांगला मित्र
शीलवान, क्षमाशील, कर्तृत्ववान यांचा सुंदर मिलाफ म्हणजे शिक्षक…
शिक्षक म्हणजे ज्ञान अमृताचा साठा, देश घडविण्यात त्यांचा मोलाचा वाटा…
शिक्षक दिनी नतमस्तक गुरुच्या चरणी माझा माथा…
✍️कवयित्री कु. हर्षदा आनंद पिंपळे, विद्यामंदिर कन्याप्रशाला वैराग, ता. बार्शी जि. सोलापूर