बदल
घरी नऊ वाजता उशीरा उठणारा, आज सहालाच उठून कामात व्यस्त राहतोय…
कधी कपडे भिजवायची माहिती नसणारा, आज स्वतःचे कपडे धुतोय..
कधी गांव सोडल, असं वाटणारा, आज गावाकड जाणारी बस दिसली तरी खुश होतोय…
बापासोबत न पटणारा, आज बापासोबत बोलण्यासाठी तरसतोय….
कधी बाहेरच खाण्याचा हटट् धरणारा, आज आईच्या हातच्या जेवणाला तरसतोय…
भावासोबत सतत भांडणारा, आज भावाला पाहण्यासाठी आतुरतोय…
कधी ही भाजी नको-कधी ती भाजी नको म्हणून फुगून बसणारा, आज मेसला असेल ती भाजी खातोय….
कधी कामाला जाईल, अस वाटणारा, आज कधी गावाकडं जाता येईल, याची वाट पाहतोय…
लहान असताना एखादं खेळण नाही भेटल तर रडणारा, आज स्वतःच ध्येय हातून सुटल तरी हसतोय…
✍️ यशवंत प्रदिप चौकटे, करमाळा.मो. 8600061675