आता तरी बरसं ना!

बरस ना बरस, थोड्या थोड्या सरींनी गारवा कुठे आलाय,
वरवरच पडतात थेंब, खोल मातीत ओलावा कुठे आलाय?
घडीत ऊन अन् घडीत पाऊस सतत वातावरणात बदल
असं करून तुला, माणसाला शिकवायची का अद्दल?
किती करावे तुझे येण्यासाठी नवस?
वाट बघतोय तुझी, बरस ना आता तरी बरस
शेतात नांगरणीची करून ठेवली आरास.
पेरणीची स्वप्नं बाळगून मनात ठेवली आस,
हरपलंय सगळं वेळेवरचं गणित,
तुझ्या आगमनावरचं ठरतंय सर्वांचं हित.
✍️अतुल ठाकूर जेऊर, ता. करमाळा मो.92841 73832