युवती सेनेच्या केम शहर प्रमुख पदी गौरी मोरे यांची निवड
केम (प्रतिनिधी/संजय जाधव)-शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या युवती सेना केम शहरप्रमुख पदी गौरी राजेश मोरे हिची निवड करण्यात आली आहे. शिवसेना तालुका संपर्कप्रमुख गणेश राणे लोकसभा निरिक्षक राहूल चव्हाण युवासेना तालुकाप्रमुख शंभूराजे फरतडे यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देऊन ही निवड करण्यात आली. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे,युवासेना प्रमुख आदित्यसाहेब ठाकरे यांच्या आदेशावरून ही निवड करण्यात आली आहे.
यावेळेस शिवसेना तालुकाप्रमुख सुधाकर काका लावंड, शहरप्रमुख प्रविण कटारिया, माजी तालुकाप्रमुख शाहूदादा फरतडे, महिला आघाडी तालुकाप्रमुख वर्षाताई चव्हाण, आशा मोरे, शिवसेना उपतालुकाप्रमुख श्रीहरी तळेकर माजी तालुकाप्रमुख उतरेश्वर तळेकर, केम शिवसेना शहरप्रमुख सतिश खानट ,युवासेना जिल्हा समन्वयक सागरराजे तळेकर , उप जिल्हाप्रमुख मयुर यादव उपशहरप्रमुख कल्पेश राक्षे, आदित्य जाधव, यांच्यासह बहुसंख्य शिवसैनिक उपस्थित होते.
युवती सेनेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचे प्रश्न, युवतींचे प्रश्न सोडवणार असून आदित्य ठाकरे यांचे विचार मजबूत करण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे गौरी मोरे हिने सांगितले.