केम जिल्हा परिषद गटाच्या आरक्षण सोडतीनंतर विविध गटाच्या महिलांमध्ये निर्माण झाली चुरस
केम/संजय जाधव
केम जिल्हा परिषद गट व केम पंचायत समिती गणाची आरक्षण सोडत नुकतीच झाली.जि. प. गट व पंचायत समिती गट या दोन्ही ठिकाणी महिला आरक्षण पडले आहे. केम जि. प. गटा साठी सर्व साधरण महिलेला आरक्षण आहे तर केम पंचायत समिती गणासाठी ओबीसी महिले साठी आरक्षण आहे. त्यामुळे केम जिल्हा परिषद गटात व पंचायत समिती गटात इच्छूक महिलांमध्ये चुरस निर्माण झाली आहे
केम जि.प.गट गेल्या पंचवार्षिक निवडणुकीत एस.सी (अनुसूचित जाती) मधील पुरूष वर्गासाठी राखीव होता. या गटातून माजी आमदार नारायण पाटील व अजित तळेकर गटाकडून अनिरुद्ध कांबळे हे निवडून आले होते. नुसतेच निवडून नाही तर ते जिल्हा परिषद अध्यक्षही झाले होते.
आता या वेळेस हा गट सर्व साधरण महिला साठी असल्याने या गटातून अजित तळेकर यांनी आपल्या पत्नीला उमेदवारी द्यावी असा आग्रह अजित तळेकर गटातील कार्यकर्त्यांनी धरला आहे.
जगताप-शिंदे युतीकडून जगताप गटाचे कार्यकर्ते युवा नेते सागर दौंड यांच्या पत्नी कौशल्या दौंड या इच्छूक आहेत. त्यांनी पण तयारी सुरू केली आहे. तर या गटाकडून गोरख पारखे हे पण जि.प. निवडणूक ईच्छूक आहे. ते आपल्या पत्नीला उमेदवारी मागतात. तर बागल गटाकडून पै महावीर आबा तळेकर यांच्या पत्नी सारिका महावीर तळेकर, ऐ पी ग्रुपचे अध्यक्ष सामजिक कार्यकर्ते अच्चूत काका-पाटिल यांच्या पत्नी सारिका तळेकर-पाटील या पण इच्छुक आहेत.
याबरोबरच युवा नेते महेश तळेकर यांच्या पत्नी पण इच्छुक असल्याचे समजते आहे. बागल गटातून ३ उमेदवार दावा करीत असेल तरी, या गटातून एकच उमेदवार राहणार. या मध्ये यांचे एकमत होऊ शकते.
आता नवीनच करमाळा तालुक्यात स्थापन झालेली प्रहार संघटना, या संघटनेचे तालुकाध्यक्ष संदिप तळेकर हे त्यांच्या पत्नी उज्वला संदिप तळेकर यांना जि.प.केम गटात ऊतरवणार आहेत. या गटामधील प्रत्येक गावात प्रहार संघटनेची शाखा काढली आहे. त्याचा फायदा यांना होऊ शकतो.
भाजपाचे अध्यक्ष गणेश (आबा ) तळेकर यांच्या पत्नी या भाजपकडून इच्छुक आहेत. शिवसेनेचे उपतालुकाप्रमुख श्री हरी तळेकर व महिला आघाडीच्या अध्यक्षा वर्षा ताई चव्हाण व शहरप्रमुख सतीश खानट,
प्रसिद्धी प्रमुख अविनाश तळेकर यांची बैठक झाली. या बैठकीत शिवसेना जो उमेदवार देईल त्याला निवडून आणू असा निर्धार व्यक्त केला.
एकदंर केम जि.प.ची निवडणूक चुरशीची होणार असे दिसत आहे. तालुक्यातील कोणत्या गटासंगे युती होणार यावर उमेदवारी अवलंबून राहणार आहे.