मतिमंद विद्यालयातील विद्यार्थ्यांसमवेत पवार यांनी साजरा केला लग्नाचा वाढदिवस
केम (प्रतिनिधी/संजय जाधव): प्रहार जनशक्ती पक्षाचे करमाळा तालुका संपर्क प्रमुख व मी वडार महाराष्ट्राचा संघटनेचे करमाळा तालुकाध्यक्ष सागर पवार यांनी केम येथील नागनाथ मतिमंद विद्यालयात विद्यार्थ्यांसमवेत स्वतः च्या लग्नाचा सातवा वाढदिवस साजरा केला.
यानिमित्ताने आयोजित कार्यक्रमात अध्यक्ष म्हणून संदीप तळेकर (प्रहार करमाळा तालुकाध्यक्ष) हे उपस्थित होते तर प्रमुख पाहुण्या श्रीमती स्वाती ताई गोरे (प्रहार करमाळा महिला तालुकाध्यक्ष) व प्रहार करमाळा तालुका सचिव प्रवीण मखरे, सुमन धोत्रे हे होत्या. या कार्यक्रमाची सुरुवात क्रांतीज्योती सावित्री बाई फुले यांच्या प्रतिमेच्या पूजनाने झाले. पाहुण्यांचे सत्कार शाळेचे मुख्याध्यापक श्री नाळे व सौ. जाधव यांच्या हस्ते करण्यात आले.
लोक आपल्या लग्नाचा वाढदिवस निरनिराळ्या पद्धतीने मोठ्या प्रमाणावर पैसे खर्च करून करतात परंतु सागर पवार व त्यांच्या पत्नी निकिता पवार यांनी मतिमंद विद्यालयात विद्यार्थ्यांसमवेत लग्नाचा वाढदिवस साजरा केला ही बाब कौतुकास्पद आहे अशा शब्दात उपस्थिती मान्यवरांनी त्यांच्या या उपक्रमाचे कौतुक केले व त्यांच्या भावी संसारिक जीवनास शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री पाटील आर वाय यांनी केले. या कार्यक्रमाचे आभार शाळेचे मुख्याद्यापक श्री. नाळे यांनी मानलं यानंतर विद्यार्थ्यांसमवेत पवार यांनी केक कापून लग्नाचा वाढदिवस साजरा केला. त्यानंतर विदयार्थाना खाऊ वाटप करण्यात आले.