भाजपच्या सोलापूर (प) जिल्हा चिटणीसपदी विनोद महानवर यांची  निवड -

भाजपच्या सोलापूर (प) जिल्हा चिटणीसपदी विनोद महानवर यांची  निवड

0

करमाळा (दि.३०) :  भारतीय जनता पार्टी सोलापूर पश्चिमच्या जिल्हा चिटणीसपदी विनोद महानवर यांची निवड जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार सावंत यांनी जाहीर केली आहे. याबाबत त्यांना नियुक्तीचे पत्र टेंभुर्णी येथे झालेल्या सदस्यता नोंदणी अभियान कार्यशाळेवेळी देण्यात आले.

विधानसभा निवडणुकीच्या काळात पक्षविरोधी काम केल्यामुळे करमाळा तालुक्यातील गणेश चिवटे यांच्यासह इतर भाजप पदाधिकाऱ्यांना पदावरून भाजप प्रदेश कार्यालयाकडून निष्कासित करण्यात आले होते.  महायुतीचे सरकार स्थापन होताच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत बावनकुळे यांच्या आदेशाने संबंधित पदाधिकाऱ्यांना पुन्हा एकदा सक्रिय होण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. त्यानुसार जिल्हा सरचिटणीस गणेश चिवटे, मंडल अध्यक्ष राम ढाणे, शहराध्यक्ष जगदीश अग्रवाल, जिल्हा उपाध्यक्ष अफसर जाधव व युवा मोर्चा अध्यक्ष अमोल पवार यांना पुन्हा एकदा त्याच पदावर रुजू करून सक्रिय करण्यात आले. परंतु भारतीय जनता पार्टी सोलापूर पश्चिमच्या जिल्हा चिटणीसपदी निवडणूकीपुर्वी काम करणारे विनोद महानवर यांच्या निवडीचे आदेश अध्याप मिळाले नव्हते. ते नुकतेच मिळालेले असल्यामुळे ते देखील आता सक्रिय होणार आहेत

यावेळी जिल्हा सरचिटणीस सचिन शिंदे, जिल्हा उपाध्यक्ष शशिकांत पवार ,माढा तालुकाध्यक्ष योगेश पाटील, संजय अण्णा घोरपडे, बाळासाहेब कुंभार ,नरेंद्रसिंह ठाकुर, सचिन चव्हाण, जितेश कटारिया, नितीन कांबळे, करमाळा महिला आघाडीच्या शहराध्यक्ष रेणुका राऊत आदी जण उपस्थित होते.

निवडीनंतर श्री महानवर म्हणाले की भाजपाचे संघटनात्मक काम वाढविण्यासाठी आपण निश्चितच मोठ्या प्रमाणात सभासद नोंदणी करू असे अभिवचन त्यांनी दिले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!