करमाळा येथे उद्या भव्य रक्तदान शिबिर – रक्तदात्यास लकी ड्रॉ मधून मिळणार बक्षिसे

करमाळा (संदेश प्रतिनिधी) – श्री महाराणा प्रताप सिंह यांच्या 456 व्या जयंतीनिमित्त करमाळा शहरात रविवार दिनांक 21 मे रोजी सकाळी दहा ते दुपारी पाच वाजेपर्यंत सुतार गल्ली मध्ये भव्य रक्तदान शिबिर व लकी ड्रॉ हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे. या कार्यक्रमांमध्ये जास्तीत जास्त लोकांकडून रक्तदान करण्यात यावे यासाठी लोकांना आकर्षित करण्यासाठी विविध बक्षिसे जाहीर केली आहेत.

करमाळा शहरातील हिंदु सूर्य महाराणा प्रतापसिंह उत्सव समितीच्या वतीने हे शिबिर आयोजित केले गेले आहे.
या रक्तदान शिबिरामध्ये सहभागी होणाऱ्या प्रत्येक रक्तदात्यास आकर्षक भेट वस्तू दिली जाणार तर आहेच त्याचप्रमाणे लकी ड्रॉ मधून निवडलेल्या रक्तदात्यास करमाळा शहरातील विविध व्यवसायिकांकडून बक्षिसे स्पॉन्सर (प्रायोजित) करण्यात आली आहेत. यामध्ये बनशंकरी मोबाईल, समर्थ प्लास्टिक, गणेश लंच होम, महावीर इलेक्ट्रॉनिक्स, अजिंक्य इलेक्ट्रॉनिक्स, भूषण मोबाईल शॉपी, शालिमार मॉल, भवानी जंक्शन, देवी प्लायवूड, महामुनी ज्वेलर्स आदी व्यवसायिक स्पॉन्सर म्हणून असणार आहेत. या शिबिरात जास्तीत जास्त नागरिकांडून रक्तदान केले जावे असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.
