मकाई सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत ३५ अर्जावर आक्षेप - २२ मे रोजी यादी जाहीर करणार - Saptahik Sandesh

मकाई सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत ३५ अर्जावर आक्षेप – २२ मे रोजी यादी जाहीर करणार

करमाळा/ संदेश प्रतिनिधी :

करमाळा : मकाई सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत दाखल झालेल्या बहुतांश अर्जावर अपूर्ण शेअर्स, सलग तीन वर्ष ऊस गाळपास नाही, तीन अपत्ये व सहकारी संस्थाच्या थकबाकी असणे अशा प्रकारचे आक्षेप आले असल्याने सवितादेवी राजेभोसले, प्रा.रामदास झोळ, बाळासाहेब पांढरे, रामभाऊ हाके, सुभाष शिंदे तसेच बागल गटाचे काही समर्थकांबाबत आदींसह 35 अर्जावर आक्षेप आले आहेत. आक्षेपांवर आज सुनावणी झाली पण त्याचा निकाल हा राखून ठेवण्यात आल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी सोपान टोंपे यांनी सांगितले आहे.

या संदर्भात 22 मे रोजी यादी जाहीर केली जाणार आहे. आज (ता.19) सकाळी 11 वाजल्यापासून तहसील कार्यालयात छाननीला सुरुवात झाली होती. सुरुवातीपासून सर्व गटाच्या हरकती ऐकून घेतल्यावर व त्यावर तीन वाजल्यापासून सुनावणी करण्यात आली. याप्रसंगी सर्व उमेदवार याच ठिकाणी वाट पाहत होते. सायंकाळी सहा वाजेपर्यंत सर्वांच्या सुनावण्या पूर्ण झाल्या निकाल मात्र राखून ठेवण्यात आला आहे. यावेळी तहसिल आवारात मोठ्या संख्येने गर्दी झाली होती.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!