कविटगाव येथे संत रामपाल महाराज यांच्या सत्संगाचा कार्यक्रम संपन्न

करमाळा (संदेश प्रतिनिधी) – कविटगाव (ता.करमाळा) येथील संत सावतामाळी मंदिरामध्ये संत रामपाल महाराज यांच्या सत्संगाचा कार्यक्रम आज (दि.१७ सप्टेंबर) मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमाला जिल्हा सेवक मधुकर माळी, करमाळा तालुका सेवक हरिदास पांडव, पंढरपूर तालुका सेवक दादा पवार, सांगोला तालुका सेवक संतोष नवले तसेच पंकज दास,पांडुरंग दास, केशव दास धोंडीबादास तसेच सरपंच शिवाजी सरडे, माजी सरपंच भगवान लोणकर, माजी सरपंच ज्योतीराम भोसले माजी उपसरपंच भाऊसाहेब जगदाळे आदी मान्यवरांबरोबरच कविटगाव व परिसरातील ग्रामस्थ उपस्थित होते.

